पंकजा मुंडे यांच्या कारखान्यात चोरी! किती लाखाचं साहित्य लंपास?

पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी झाली आहे. कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पंकजा मुंडे यांच्या कारखान्यात चोरी! किती लाखाचं साहित्य लंपास?
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 10:25 AM

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी झाली आहे. कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी 22 डिसेंबरला परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. (Theft at Pankaja Munde’s Vaidyanath Sugar Factory)

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 ला चोरी झाली. त्याची माहिती स्टोअर किपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज जमीन शेख यांना कळवण्यात आली. त्यानंतर लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचं शटर उचकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

कारखान्यातील कोणते सामान चोरीला?

चोरीच्या या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य लंपास करण्यात आलं आहे. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. या प्रकरणात 22 डिसेंबर रोजी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा तपासाला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या:

वैद्यनाथ कारखान्याच्या पाण्याचा शेतीला फायदाच, व्हिडीओतून दावा

भाजप संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांची 310 कोटींची हमी ठाकरे सरकार रद्द करणार?

Theft at Pankaja Munde’s Vaidyanath Sugar Factory

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.