सात वर्षांच्या चिमुकलीला दुर्धर आजाराने ग्रासलं, शस्त्रक्रियेचा खर्च कुटुंबीयांना परवडेना; चिमुकलीसाठी परळीकरांनी घातली साद

सानवी चौंडे या परळीच्या कन्येला वैद्यकीय उपचारासाठी २५ लाख रुपयांची गरज आहे. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. या चिमुकलीला आपल्या मदतीने उपचार मिळू शकेल.

सात वर्षांच्या चिमुकलीला दुर्धर आजाराने ग्रासलं, शस्त्रक्रियेचा खर्च कुटुंबीयांना परवडेना; चिमुकलीसाठी परळीकरांनी घातली साद
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 3:42 PM

परळी : परळी शहरातील शिवाजीनगर भागात सानवी चौंडे ही सात वर्षांची चिमुकली राहते. सानवीला या चिमुकलीला दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. परळीकरांनी तिच्यासाठी माणुसकीचा आधार दिलाय. सानवीच्या शस्त्रक्रियेला 25 लाख रुपयांचा खर्च आहे. हा खर्च चौंडी यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन मित्रमंडळींनी केलं होतं. आज याच पार्श्वभूमीवर सानवीसाठी परळीकर रस्त्यावर उतरले. शिवदीप चौंडे हे प्रेस कामगार आहेत. त्यांच्या उत्पन्नात केवळ घराला हातभार लागतो. परंतु सानवीच्या आजाराला पैसे नसल्याने ते हतबल झाले आहेत. या रॅलीत सामाजिक संस्था, वैद्यकीय कर्मचारी तसेच पत्रकार सहभागी झाले होते. दुकानात जाऊन पैसे गोळा करण्यात आले. रस्त्यावरील लोकांनीही मदत केली. कार थांबवून त्यांच्याकडून मदत घेण्यात आली.

२५ लाख रुपयांची उपचारासाठी गरज

थायलोसिमिया एनलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा दुर्धर आजार सानवीला झाला आहे. त्यासाठी 25 लाखांचा खर्च सांगण्यात आला. त्यामुळे आज परळीकरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मदत फेरी काढून सांगवीला एक मदतीचा आधार दिला आहे. आरोग्याच्या साथीला मदत परळीच्या लेकीला अशा आशयाचे बॅनर बनवण्यात आले. वैद्यकीय मदत फेरी काढण्यात आली. एक बॉक्समध्ये मदत जमा करण्यात आली. परळीच्या लेकीला सढळ हाताने मदत करा, असा आवाहन करण्यात आले.

असे करण्यात आले आवाहन

सानवी चौंडे या परळीच्या कन्येला वैद्यकीय उपचारासाठी २५ लाख रुपयांची गरज आहे. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. या चिमुकलीला आपल्या मदतीने उपचार मिळू शकेल. या उपचारातून तिला जीवनदान मिळेल. अत्यंत गोड अशा या लेकराला आपल्या मदतीची गरज आहे, असे आवाहन करण्यात आले. सानवीचा फोटोही बॅनरवर लावण्यात आला. या मदत फेरीला परळीकरांची चांगली साथ दिली. या फेरीत मोठ्या प्रमाणात परळीकर सहभागी झाले होते. त्यामुळं बऱ्यापैकी मदत सानवीला झाली. यातून तिच्या उपचारासाठी काही हिस्सा मिळाला. याशिवाय आणखी तिला मदतीची गरज आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.