AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये रुग्णवाहिकेचा अपघात, भरधाव कारची धडक, एक ठार, 3 जखमी, केजमध्ये पिकअप रिक्षा उलटला

बीडः मंगळवारी बीडमधून कोल्हापूरकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील कारने रुग्णवाहिकेला जबरदस्त धडक दिल्याने अपघात झाला. ही रुग्णवाहिका नगरवरून बीडकडे जात होती. या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना अहमदनगर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. अवधूत नंदकुमार गरगटे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील सुर्डीजवळ हा […]

बीडमध्ये रुग्णवाहिकेचा अपघात, भरधाव कारची धडक, एक ठार, 3 जखमी, केजमध्ये पिकअप रिक्षा उलटला
बी़डमध्ये रुग्णवाहिकेला अपघात, एक ठार, तिघे जखणी
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 01, 2021 | 11:16 AM
Share

बीडः मंगळवारी बीडमधून कोल्हापूरकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील कारने रुग्णवाहिकेला जबरदस्त धडक दिल्याने अपघात झाला. ही रुग्णवाहिका नगरवरून बीडकडे जात होती. या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना अहमदनगर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. अवधूत नंदकुमार गरगटे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील सुर्डीजवळ हा अपगात झाला.

पुण्याला रुग्ण घेऊन जात होती रुग्णवाहिका

मंगळवारी नगरहून बीडकडे एक रुग्णवाहिका जात होती. मात्र समोरून येणाऱ्या भरधाव कारने सुर्डी फाट्यावरील वळणावर येताच समोरासमोर दोन्ही वाहनांची धडक होऊन अपघात झाला. अपघातात अवधूत गरगटे या कारमधील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

केज तालुक्यातही गंभीर अपघात

अन्य एका अपघातात, पिकअपचालक दत्तात्रय हे मेंढ्या घेऊन अहमदनगरहून मुरुड येथील आठवडी बाजाराला जात होते. मंगळवारी पहाटे पिकअप हा केज-मांजरसुबा रस्त्यावरील उमरी फाट्याजवळ आला असता अचानक रस्त्यावरून उलटला. या अपघातात चालक दत्तात्रय पांढरे याच्या डोक्याला मार लागला असून काही मेंढ्याही जखमी झाल्या. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.

इतर बातम्या

भाजपच्या ‘सरकारी’ दहशतवाद्यांशी आम्ही पुरलो आहोत, ममता बॅनर्जी आणि संजय राऊत भेटीत एकीवर चर्चा!

हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा मनस्ताप कमी होणार, पनवेल ते गोरेगाव थेट लोकल सुरु

Follow Us
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस