Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parli Murder Story : बाबोव! परळीचा विषयच डेंजर, जमीन खोदली की मुडदा? राजकीय हाडवैराच्या वाचल्या का या रक्तरंजीत कथा?

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी वार्ता मराठवाड्याला नवीन नाहीत. पण राज्याला त्याची आता नव्याने ओळख होत आहे. परळीतील राजकीय गुन्हेगारी आणि खूनांची मालिका जुनीच आहे. आता ती नव्याने पुन्हा चर्चेत आली आहे. काय आहे या टेरर कथा?

Parli Murder Story : बाबोव! परळीचा विषयच डेंजर, जमीन खोदली की मुडदा? राजकीय हाडवैराच्या वाचल्या का या रक्तरंजीत कथा?
परळीतील खूनाची मालिका
Follow us
| Updated on: Jan 23, 2025 | 2:37 PM

प्रतिनिधी अक्षय मंकनीसह संभाजी मुंडे, टीव्ही ९ मराठी : बीड जिल्ह्या गेल्या एक महिन्यापासून माध्यमांच्याच नाही तर पोलीस, सीआयडी, विशेष पथकांच्या रडारवर आला आहे. खंडणी पॅटर्न, बोगस पीक विमा पॅटर्न असो की हत्येचा पॅटर्न बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी वार्ता मराठवाड्याला नवीन नाहीत. पण राज्याला त्याची आता नव्याने ओळख होत आहे. परळीतील राजकीय गुन्हेगारी आणि खूनांची मालिका जुनीच आहे. आता ती नव्याने पुन्हा चर्चेत आली आहे. काय आहे या टेरर कथा?

हे तर क्राईट सिंडीकेट

आजवर परळीत पडलेल्या खूनांचे पट जर उलगडले तर एखाद्या क्राईम सिंडिकेटची वेबसीरिजही फिकी पडेल. इतक्या किड्यामुंग्यासारखे गेल्या काही दशकात इथं खून झालेत.अनेक घटना तर आजही गूढच आहेत. परळीतील पहिलं गाजलेले हत्याकांड जवळपास 30 वर्षांपूर्वीचं आहे. साल 1997-98 मध्ये परळीतील एका कला शिक्षकाची तरुण मुलगी जळून मरते काय आणि तिच्या मृत्यूनंतर तिचे वडीलही गळफास घेवून स्वतःचं आयुष्य संपवतात काय? समाजमन सुन्न होतं. पुढे काही काळ साऱ्या कुटुंबाची वाताहत होते. पण तरुणीसोबत नेमकं काय घडलं होतं, हे कधीच बाहेर येत नाही.

हे सुद्धा वाचा

दिवसाढवळ्या पब्लिकमध्ये खून

साल 2001, ठिकाण तेच परळी. संगीत दिघोळे नावाच्या राजकीय कार्यकर्त्याचा भरदिवसा परळी कोर्टासमोर खून होतो. जवळपास शंभर लोक उघड्या डोळ्यांनी हत्या पाहतात. पण दहशतीमुळे साक्ष द्यायला एकही पुढे येत नाही. आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सूटतात. पुढे 2008 मध्येच दिघोळेंच्या हत्येचा आरोपी असलेला किशोर फड याची हत्या होते. आरोपी पुराव्यांअभावी निर्दोष सुटतात. नंतर साल 2015. पुन्हा आधीच्या हत्येतील आरोपी काकासाहेब गर्जेची हत्या होते. त्याप्रकरणाचाही पुढे सोक्षमोक्ष लागत नाही.

संतोष देशमुख हत्येनंतर या साऱ्या हत्यांची कहाणी सांगणारा एक व्हिडीओ कमलाकर राऊत नावाच्या व्यक्तीनं केला होता, ज्यावरुन त्यांना अनेक धमक्याही आल्याची माहिती त्यांनी दिली. या साऱ्या घटनांवर भाजपच्या सुरेश धसांनी पुन्हा एकदा बोट ठेवत चेतना कळसेपासून ते संतोष देशमुखांपर्यंतच्या घटनांचा उल्लेख केला आहे.

आता तरी चेतना कळसेला मिळले का न्याय?

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता चेतना कळसेला न्याय मिळेल का? असा सवाल विचारण्यात येत आहे. २ दशकांपूर्वी परळी कळसे नावाचं कुटुंब राहत होतं. तरुणी चेतना कळसेचे वडील कलाशिक्षक होते. सुखानं नांदणाऱ्या या मध्यमवर्गीय कुटुंबात अचानक एके दिवशी चेतना कळसेचा जळून मृत्यू होतो. काही दिवसांनी तिचे वडील गळफास घेवून आत्महत्या करतात. चेतना कळसे जळली की जाळली गेली., याबद्दल परळीत नाव न सांगता अनेक लोक आपापली माहिती सांगतात.

महादेव मुंडेंचे आरोपी मोकाट

धक्कादायक म्हणजे धसांनी गेल्यावर्षी झालेल्या महादेव मुंडेंच्या हत्येचं प्रकरणातही गौप्यस्फोट केला आहे. 22 ऑक्टोबर 2023 ला परळीत दुधाचा व्यवसाय करणाऱ्या महादेव मुंडेंची हत्या झाली. त्यात वाल्मिक कराडच्या मुलासोबत फिरणारे अनेक आरोपींना अभय दिला गेल्याचा आरोप करत धसांनी त्यातल्या आरोपींच्याही अटकेची मागणी केली आहे.

परळीत हत्येची मालिका

परळीतले काही स्थानिक सांगतात की हत्यांची ही मालिका प्रामुख्यानं 2001 पासून म्हणजे संगीत दिघोळेच्या हत्येनं सुरु झाली. सर्वांवर दहशत माजवणारा दिघोळे हा टी.पी.मुंडेंचा कट्टर समर्थक होता. राजकीय महत्वांकाक्षेंपोटी टी.पी.मुंडेंसह दिघोळे आणि इतर कंपनी वेगळे होऊन राष्ट्रवादीत गेले.

2001 ला मुंडे समर्थक किशोर फडसह इतरांवर दिघोळेच्या हत्येचा आरोप झाला. दिघोळेसारख्या दहशत पसरवणाऱ्या व्यक्तीच्या हत्येशी नाव जोडलं गेल्यानं किशोर फडचंही प्रस्थ वाढलं. फडच्याही राजकीय आकांशा मोठ्या होवू लागल्या. त्याच महत्वाकांक्षेपायी त्यानंही राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण 2008 ला किशोर फडचीही धारधार शस्रानं हत्या झाली. या प्रकरणात मुंडे समर्थक काकासाहेब गर्जे आणि बबन गीत्ते आरोपी झाले.

नंतर 2015 ला काकासाहेब गर्जे यांचीही हत्या झाली. पुढे यातले दुसरे आरोपी बबन गीत्ते 2024 ला धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले. कधी काळचे कट्टर मुंडे समर्थक राजकीय वादातून कट्टर विरोधक बनले. यंदाच्या विधानसभेला बबन गित्ते धनंजय मुंडेंविरोधात उमेदवार असण्याची चर्चा होती, मात्र त्याआधी सरपंच बापू आंधळे हत्येत बबन गीत्तेचं नाव आलं. आणि ते फरार झाले.

सर्वात धक्कादायक म्हणजे की यातल्या काही घटना नव्वदच्या काळात घडल्या. मात्र परळीत आजही कुणी त्यावर जाहीरपणे बोलायला तयार होत नाही. कुणाचं नाव घेऊन किंवा आरोप करुन बोलणं तर दूरच. पण साधं घडलं काय होतं हे सुद्धा बोलण्यास जुने-जाणते लोक फारसे धजावत नाहीत. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार परळी तालुक्यातच १०९ मृतदेह सापडले. तर त्यातील ५ जणांचा खून झाला म्हणून नोंद करण्यात आली.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.