Beed | इथल्या पुढाऱ्यांमुळे साखर कारखाना बंद, आमदार संदीप क्षीरसागरांचा आरोप, काका-पुतण्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

बीडमधील क्षीरसागर काका- पुतण्याचा वाद राज्याला सर्वश्रुत आहे. दोघेही काका-पुतणे कट्टर राजकीय वैरी आहेत. नुकताच गजानन सहकारी साखर कारखान्यावरून पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकांवर आरोप केले.

Beed | इथल्या पुढाऱ्यांमुळे साखर कारखाना बंद, आमदार संदीप क्षीरसागरांचा आरोप, काका-पुतण्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 12:28 PM

बीडः  काका- पुतण्याचा वाद हा बीड जिल्ह्यासाठी काही नवीन नाही. परळी येथील मुंडे (Munde), तर वडवणी येथील सोळुंके आणि त्यानंतर बीडमधील क्षीरसागर कुटुंबाचे वाद चव्हाट्यावर आले आहे. काका जयदत्त क्षीरसागर यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर पुतणे संदीप क्षीरसागर यांनी वेगळी चूल मांडली. बीड विधानसभा मतदारसंघातील जनतेनी देखील संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांना स्वीकारत थेट आमदार पदावर बसविले. त्यानंतर एकानंतर एक अशा विविध निवडणुकांमध्ये संदीप क्षीरसागर गटाचा विजय होताना दिसत आहे. ग्रामीण भागात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राजुरी सेवा सोसायटीवरही आमदार संदीप क्षीरसागर गटाचा दणदणीत विजय झाला. त्यामुळे काका जयदत्त क्षीरसागर (Jaidatta kshirsagar) यांच्यावर टीका टीप्पणी करण्याची एकही संधी पुतणे सोडत नाही. नुकताच एका कार्यक्रमात त्यांनी गजाजन सहकारी साखर कारखाना बंद पडण्यासाठी इथले ‘पुढारी’ जबाबदार आहेत, असं वक्तव्य केलं.

कारखान्यावरून राजकारण पेटलं…

बीड मतदारसंघ आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून दिवंगत लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांनी राजुरी सर्कलमधील वंजारवाडी येथे गजानन सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती. मात्र क्षीरसागर यांच्या कौटुंबिक वादातून कारखाना डबघाईला आला. आज स्थितीला कारखाना बंद आहे. आणि याच कारखान्यावरून क्षीरसागर काका- पुतण्यात पुन्हा एकदा राजकरण पेटले आहे.

काय म्हणाले संदीप क्षीरसागर?

कारखाना सुरू असताना त्यातून फायदा घेण्याचे काम इथल्या पुढाऱ्यांनी केला. कारखान्याला मात्र काही दिलेच नाही. या पुढाऱ्यांची भाषणे प्लेन आणि सॅटेलाईटची असतात. मला चालू असलेली गोष्ट भेटलीच नाही, त्या पुढाऱ्यांचे नाव मी घेणार नाही अशा शब्दात पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. विविध विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी एका कार्यक्रमात ते बोलत होते.

एकाच बंगल्यात राहून कट्टर राजकीय वैरी….

क्षीरसागर काका- पुतण्याचा वाद राज्याला सर्वश्रुत आहे. दोघेही काका-पुतणे कट्टर राजकीय वैरी आहेत. विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे एकाच बंगल्यात राहतात. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे संपूर्ण कुटुंबांचे स्वयंपाकगृह एकच आहे.

इतर बातम्या-

Nashik | स्ट्रक्चरल ऑडिट न करताच रामसेतू कसा पाडणार; स्मार्ट सिटी संचालकांचा सवाल, वादात काँग्रेसची उडी

नाशिक मधील शिवसैनिक मुंबईकडे रवाना , संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची तयारी

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.