AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : बीड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झालं की नाही? जिल्हाधिकाऱ्यांकडून मोठा खुलासा

बजरंग सोनावणे यांनी आज बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी टीव्ही9 मराठीसोबत बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Video : बीड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झालं की नाही? जिल्हाधिकाऱ्यांकडून मोठा खुलासा
| Updated on: Jun 02, 2024 | 9:49 PM
Share

लोकसभा निवडणुकांदरम्यान चौथ्या टप्प्यामध्ये बीड मतदारसंघातील बुथ कॅप्चर केल्याचा दावा करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांनी यावरून टीका केली होती. त्यामुळे बीडमध्ये बोगस मतदान झालं की नाही याबाबत राज्यभरात चर्चा होत होती. बजरंग सोनावणे यांनी आज बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी टीव्ही9 मराठीसोबत बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाल्या दीपा मुधोळ?

प्रत्येक मतदारसंघनिहाय नेमकी कशा प्रकारे मतमोजणीची प्रक्रिया पार पडते. त्यासाठी किती माणसांची नेमणूक केली जाते. याबाबत बजरंग सोनवणे यांना मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आहे. परळीमधील जे काही आक्षेप होते त्याबाबतचे मेलवर आम्हाला काही व्हिडीओ आले होते. त्यासोबतच पुन्हा मतदान घेण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती. परंतु सर्व व्हिडीओ पाहिल्यावर कोणत्याही प्रकारचे बोगस मतदान किंवा बुथ कॅप्चरिंग करण्यात आलं नसल्याचं निदर्शनात न आल्याने पुर्नमतदानाची मागणी नाकारली असल्याचं दीपा मुधोळ यांनी सांगितलं.

देशभरात चौथ्या टप्प्यात मतदान झालं त्यामध्ये बीड मदारसंघाचा समावेश होता. बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे आमनेसामने होते. मतदान झाल्यावर सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यामध्ये एक माणूसच मतदान करत असून नागरिकांना त्यांच्या बोटाला शाई लावून माघारी पाठवलं जात असल्याचं दिसत होतं. हा व्हिडीओ बीडमधील एक बुथ सेंटरवरील असल्याचा दावा केला जात होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हे बुथ कॅप्चरिंग झालं नसल्याचं स्पष्टीकरण मुधोळ यांनी दिलं.

बजरंग सोनवणे आज स्ट्राँग रूमकडे पाहणीसाठी आले होते. यावेळी त्यांनी, कांबळे साहेब हात आकडू नका. अन्यथा मी स्वत:ला संपवून घेईन, असं म्हणत सोनवणे यांनी निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांना धमकी दिली होती. मात्र आता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी बजरंग सोनवणेंना मतमोजणीची प्रक्रिया पार पडते याबाबत माहिती देत बोगस मतदान झाल्याचं फेटाळून लावलं आहे.

प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.