VIDEO | बीडच्या गुणी गायिकेला पंकजा मुंडेंनी घेतले दत्तक, शामलचा आवाज पंतप्रधानांसह देशात पोहोचवण्याचं आश्वासन

मलने नुकतीच पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी तिचं आवर्जून स्वागत केलं. तसंच तिला दत्तक घेत असल्याचं जाहीर केलं. एवढंच नाही तर शामलचं देशभक्तीपर गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

VIDEO | बीडच्या गुणी गायिकेला पंकजा मुंडेंनी घेतले दत्तक, शामलचा आवाज पंतप्रधानांसह देशात पोहोचवण्याचं आश्वासन
मूळ बीडची रहिवासी शामल सौंदरमल हिला पंकजा मुंडेंनी घेतले दत्तकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 2:49 PM

मुंबईः मूळची बीडची असलेली शामल सौंदरमल (Shamal Saundarmal) या गुणी गायिकेला भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी दत्तक घेतले आहे. पंकजा मुंडे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली. शामल सौंदरमल आणि तिचे कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास असले तरीही ते मूळचे बीड येथील आहेत. रोजीरोटी कमावण्यासाठी मुंबईत आलेल्या या कुटुंबाचे अहोरात्र कष्ट सुरु असतात. शामलची आई किशाबाई सौंदरमल (Kishabai Saundarmal) यांचाही आवाज दैवी देणगी असल्यागत असून त्यांचा व्हिडिओदेखील यापूर्वी व्हायरल झाला होता. किशाबाई या दिव्यांग आहेत. पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाचा गौरव करणारं काव्य किशाबाई सौंदरमल यांनी लिहिलं होतं. अत्यंत साधेपणाने घरात कणिक मळताना त्यांनी गायलेलं हे गाणं पंकजा मुंडे यांनीच फेसबुकवर प्रसिद्ध केलं होत. त्यानंतर आता किशाबाई यांची मुलगी शामल हिचं ‘ऐ मेर वतन के लोगो..’ हे गाणं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केलं असून शामलला एक उत्तम गुरु लाभेपर्यंत आपण हिला दत्तक घेतोय, असं आश्वासनही पंकजा मुंडे यांनी दिलंय.

शामलचं कुटुंब मूळ बीडचं.

आई किशाबाई सौंदरमल या एका हाताने दिव्यांग आहेत. त्या स्वतः शाळेत असतानाही वर्गातील विद्यार्थी जेवणाचा डब्बा खायचे आणि वर्गातील शेवटच्या बाकाशी बसून त्या गाणे लिहित असत. किशाबाई जेव्हा पोटापाण्यासाठी मुंबईत आली तेव्हा हातच नसल्याने धुणी भांडी करायलाही अनेकांनी नकार दिला. अखेर मोडके पैसे कमावून दिवस भागवण्याची सुरुवात झाली. किशाबाई यांचे पतीही मजुरी करतात. किशाबाई यांना एक मुलगा प्रथम आणि मुलगी शामल. प्रथम हा उत्तम लिखाण करतो तर आईचा गोड गळा शामलला लाभला. या दोघींचेही गाण्याचे व्हिडिओ प्रथम हा नेहमी पंकजा मुंडे यांना पाठवत होता. अखेर 7-8 महिन्यांपूर्वी त्यांनी मुंबईत पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर पंकजा यांनी या दोघींचे गाणे म्हणतानाचे व्हिडिओ फेसबुकवर टाकले होते.

शामलचा आवाज देशभरात पोहोचवण्याचं आश्वासन

दरम्यान, शामलने नुकतीच पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी तिचं आवर्जून स्वागत केलं. तसंच तिला दत्तक घेत असल्याचं जाहीर केलं. एवढंच नाही तर शामलचं देशभक्तीपर गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या-

Success Story : बिगर मोसमात कलिंगड लागवडीचे धाडस केले, व्यापारी थेट शेतकऱ्याच्या बांधावर आले

VIDEO : परीक्षा केंद्रांवर Copy आढळल्याने Nanded मधील 7 शाळांना शिक्षण विभागाची नोटीस

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.