Birth Day: बीडचा बर्थ डे बॉय कोण आहे पाहिलंत का? शहरात पोस्टरबाजी अन् बँडबाजाही जोरात!!

Birth Day: बीडचा बर्थ डे बॉय कोण आहे पाहिलंत का? शहरात पोस्टरबाजी अन् बँडबाजाही जोरात!!
बीडमध्ये भिकाऱ्याचा वाढदिवस

बीडमध्ये सध्या आगळ्या वेगळ्या बर्थ डेची चर्चा रंगली आहे. माजलगावच्या तरुणांनी साजऱ्या केलेल्या या वाढदिवसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेत.

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 02, 2022 | 4:11 PM

बीडः वाढदिवस म्हंटलं की कधी जेसीबीतून फुलांची उधळण तर कधी तलवारीने केक कापण्याचं फॅड सध्या राज्यभरात दिसून येतं. एखाद्या राजकारण्याचा, लोकप्रिय कार्यकर्त्याचा वाढदिवस असला तर पहायलाच नको. पण या सगळ्या वाढदिवसांपुढे हटके ठरावा, असा वाढदिवस बीड शहरात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस एवढा जंगी आणि एवढा कौतुकास्पद होता की, आयोजकांवर अनेकांकडून स्तुतीसुमनं उधळली जातायत. आणि बर्थ डे बॉय कोण होता, हे पाहून तर अनेकांना या सेलिब्रेशनचा आणखीच अभिमान वाटेल.

बर्थडे बॉय- भिकारी, शहरात दणक्यात पोस्टरबाजी

बीड जिल्ह्यातील माजलगावच्या माजलगावच्या तरुणांनी चक्क एका भिकाऱ्याचा वाढदिवस मोठ्या डामडौलात साजरा केलाय. भिकाऱ्याच्या वाढदिवसाचे शहरात बॅनर लावत त्यावर भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा देखील देण्यात आले आहेत. डोक्यावर फेटा आणि सेल्फी काढत शिवाय बँडबाजा लावून भिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त शहरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.

Birthday beed

वाढदिवसाला मिठाई भरवताना तरुण

भिकाऱ्याचे वाढदिवस करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून तो चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान वाढदिवसापोटी पैशांची उधळण करणाऱ्या नेत्यांना आळा बसावा म्हणून हा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाने सांगितलंय..

इतर बातम्या-

Sangli Polictics: सांगलीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या डायरीवरून नवा वाद, गोपीचंद पडळकर नाराज का?

Sulli Deal | मुस्लीम महिलांच्या फोटोवर त्यांची किंमत, महिला आयोगाने घेतली गंभीर दखल, ‘सुल्ली डील’ नेमका प्रकार काय ?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें