Manoj Jarange: अंगात त्राण नाही, डोळे डबडबले… मध्यरात्री अडीच वाजता मनोज जरांगे यांचे समाजाला भावनिक आवाहन, म्हणाले मला मुंबईत जाऊन…

Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करत मुक्कामाचा पहिला टप्पा गाठला. रात्री 12:30 वाजता देखील पाटोद्यात मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधवांची गर्दी दिसली. मध्यरात्री अडीच वाजता जरांगे पाटील यांनी समाजाला मोठे आवाहन केले.

Manoj Jarange: अंगात त्राण नाही, डोळे डबडबले... मध्यरात्री अडीच वाजता मनोज जरांगे यांचे समाजाला भावनिक आवाहन, म्हणाले मला मुंबईत जाऊन...
मनोज जरांगे पाटील, मुंबई मराठा मोर्चा
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 7:37 AM

मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडकण्याचा निर्धार पक्का केला आहे. त्यांच्या नियोजित दौऱ्याचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होता. रात्री रात्री 12:30 वाजता त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने समाज उपस्थित होता. या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सलग उपोषणामुळे त्यांच्यात बोलण्याचाही त्राण दिसला नाही. त्यांनी उपचारांना नकार दिल्याने पेच वाढलेला आहे. रात्री मराठा बांधवांनी त्यांना सलाईन घेण्याची विनंती केली. जोरदार घोषणा दिल्या. दरम्यान मध्यरात्री अडीच वाजता जरांगे पाटील यांनी समाजाला आवाहन करत, सरकारला मोठा इशारा दिला.

आता अंगात ताकद नाही

मध्यरात्री 2:30 वाजता जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. शेवटी कोणी कोणाच नाही. आपल्याला आपल्या संसाराचा गाडा मोठा करायचा आहे. आपल्या लेकी बाईचा संसार मोठा करा. सगळे निवडणूक येते पण आपल्याला कोणी मोठं करत नाही. लढायला शिका. त्यांचे लेकरं एसी मध्ये बसले आहेत. मी चांगल्या चांगल्या ना जेरीस आणतो. अंगावर जायला घाबरत नाही. 18 दिवस झाले उपोषण करत आहे. आता अंगात ताकद उरली नाही. माझं शरीर थकलं. तुमच्यासाठी सरकारला अंगावर घ्यायची ताकद ठेवतो, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

सरकारला शरण जाणार नाही

सरकारला वाटत मी शरण यावं. मी माझ्या लेकराणा वनवासात सोडून देऊ का आणि तुमच्याशी मैत्री करू का, असा सवाल त्यांनी केला. कोणतंही सरकार पडायची आणि निवडून आणायची, मा‍झ्या समाजात ताकद आहे. मी मरेल पण मान खाली घालू देणार नाही. मी चांगला असल्यावर मला प्रवासात असताना काही वाटत नाही. मी सांगितले होते तुम्ही येऊ नका. मला गोळ्या घातल्या जाणार आहे. ते गाड्या पळवणार आहे. तुमच्या लेकराच नाव घेतल्या शिवाय मी घास घेत नाही. 23-24 दिवस झाले तुमच्या लेकरासाठी काम केलं. मी शेतात गेलो नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

माझी तब्येत खालावली

यावेळी अनेकांच्या मनात कालवाकालव झाली. मनोज जरांगे यांना सलाईन घेण्याची विनंती करण्यात आली. मी 12 तारीख ला सलाईन सोडली तेव्हा पासून तबेत खालावली. सलाईन सुटल्यामुळे मला प्रवास करत येई ना. आज मला हात पाय वर करता येत नाहीत. हा दौरा ठरला प्रमाणे करायला पाहिजे, असे जरांगे पाटील म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र खूप आता उसळला आहे. मी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं. मला वाटलं रत्याने फक्त आशीर्वाद द्यायला राहतील, पण तुम्ही गाड्या आणल्या. मला वाटलं 3-4 गाड्या असतील. लोक स्वार्थी झाले. स्वार्थ सोडून कोणीही काम करत नाहीत, असे म्हणाले.

लोक सलाईन घ्यायला आग्रह करत आहे.त्या वर जरांगे म्हणले आधी संकट समजून घ्या मग बोलत जा. मी पाटोदा का आलो तुम्हाला माहित आहे का? तुमच्या सारखे कणखर लोक होणे नाही. माझं वय काहीच नाही पण मी थकलो. 58 लाख नोंदी मिळून दिल्या. अडीच कोटी जण आरक्षणमध्ये घातले. आता गॅझेट साठी लढा सुरू आहे. तुम्ही थांबायला पाहिजे होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला नंतर बोलावतो, असे जरांगे पाटील म्हणाले.

मला मुंबईतच मरु द्या

मी माझा डाव टाकतो. देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकावा लागतो. देवेंद्र फडणवीस यांना मी तीन वर्षे हरवलं. आपल्याला पेनडाईव्ह मध्ये नोंदी आणून दिल्या. 58 लाख आहे म्हणते. आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. कोणाची माय मेली नाही मला मुंबईत हात लावायला. मला मुंबईतच मरु द्या, असे जरांगे म्हणताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

आरक्षण महत्त्वाचे की दौरा असा सवाल त्यांनी केला. लोक सर्दी झाली तरी घरा बाहेर निघत नाहीत. पोटात कलावते तरी मी तुमच्या समोर उभा आहे. सगळे मिळून संकटांना तोंड द्यायचे आहे. उद्या पोटद्यामधून एक गाडी माझ्या मागे असेल. तुम्हाला नुसता गोधळ करायचा असेल तर मी आंतरवाली सराटीला जातो. मी तिकडे मुंबईल चाललो म्हणजे गोट्या खेळायला चाललो का? तुम्ही जर असे कराल तर मी मुंबईला मार्ग बदलून जाईल.

मला जर त्यांनी आझाद मैदानात जाऊ दिले नाही तर तुम्ही या मग. जर मी गेलो तर गरज पडली तर तुम्हाला बोलावतो. उपोषणात दौरा नको होता. उपोषण सुरू नव्हतं करायला पाहिजे होतं. ते मुंबईत करायला पाहिजे होतं. मला मंत्री म्हणतात मी माझ्याशी मैत्री करा. मी घरच्यांना सांगितले मी मेलो तर घरच वावर विकून खा, पण कोणासमोर गुडघे टेकू नका. मी लय कमवलं असतं. पण मी समाजाची प्रतिष्ठा कमी होऊ दिले नाही, असे सांगताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले.

मी सलाईन घेतली तर सरकार बिनधास्त होतं. सलाईन सोडली की सरकार टेंशनमध्ये येते. मी चांगल्या चांगल्याची जिरवली फक्त मुंबईत जाऊन मला यांचे डाव बघायचे आहे. मी आजारी असल्याने आता दौरा शक्य नाही. मी पोलिसांना सांगून पाटोदा वरून निघतो. आता थेट पाटोदा ते हडपसर किंवा खापोली दौरा टाकतो. जर पोटाची आग कमी झाली तर श्रीगोदा पण येतो, असे जरांगे पाटील म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us