
Pankaja Munde : राज्यात जातीयवादी रक्तबिजासारख्या राक्षसांचं मोठं आव्हान असल्याचे मोठे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. आज विजयादशमीनिमित्त भगवानगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडे यांनी दमदार भाषण केलं. यावेळी आमदार धनंजय मुंडे, प्रतिम मुंडे, महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते मंचावर उपस्थित होते. आमच्या ताटातील काही घेऊ नका असे आवाहन ही यावेळी पंकजा मुंडे यांनी केले.
भगवान गडाचा दसरा हिरावला
भगवान गडाचा दसरा हिरावून घेतला. आता हा मेळावाही तुम्ही हिरावून घेताय असं वाटतं. तुम्ही शुद्धीवर नाही. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुम्ही माझी माणसं नाहीत. गोंधळ घालणाऱ्यांनी कितीही माझ्या नावाच्या घोषणा दिल्या तरी तुम्ही पवित्र होणार नाही. कारण अशी बेशिस्त मी यापूर्वी मेळाव्यात पाहिली नव्हती, असे त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना बजावलं. तर लोकांचं दुख पाहून वेदना झाल्या. मी शब्दात मांडू शकत नाही. मोदी आणि फडणवीस यांच्यावतीने शब्द देतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत. पूर्ण मदत करणार आहोत, असं आश्वासन त्यांनी दिलं.
जातीयवादी राक्षस उभे झाले
नव दिवस आमच्या घरात कांदा लसूण नाही. नॉनव्हेज नाही. नऊ दिवस आम्ही देवीची पूजा केली. या देवींनी महिषासुर, रक्तबिजासारखा राक्षस संपवून टाकला आहे हे सांगताना त्यांनी आज रक्तबीजासारखा राक्षस जन्माला आलाय. तुमच्या मेंदूत जन्माला आला. चुकीच्या निर्णयातून, संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात. जातीचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. तर देवीला प्रार्थना करते हे राक्षस नष्ट करण्याची शक्ती दे, अशी विनंती त्यांनी केली.
माणुसकीचा धागा
मी एका बौद्ध समाजातील माणसाच्या घरी गेले. तर माझा वंजारा समाजाचा माणूस राशन घेऊन गेला. कैकाडी समाजाच्या कुटुंबाला राशन दिलं. यातून जाती गळून पडत आहे. मला आनंद आहे की जाती गुंडाळून माणुसकीचा धागा जोडण्याचं काम आपण केलं. भगवान बाबा म्हणायचे एक एकर शेती विका पण शिका. मी तुम्हाला आवाहन करते की दोन घास कमी खा. पण स्वाभिमानाने राहा. कुणाचे तुकडे उचलू नका. खोटे धंदे करू नका. काही गरज नाही हे करायचे. चांगल्या माणसाचं चांगलं होतंय. भगवान बाबांचे आशीर्वाद सोबत आहेत, असे त्या म्हणाल्या.
शायरीतून व्यक्त केल्या भावना
विरासत में संघर्ष मिला है, तो जिद भी मिली है लडने की
चाहे जो भी हो, दटकर आगे बढने की
बदलू मै क्यों मै विचारोंकी अटल चोटी हूँ
मै गोपिनाथ मुंडे की बेटी हूँ
अशा भावना त्यांनी शेरोशायरीतून व्यक्त केल्या.