IND vs PAK : आता लाहोर नाही कराची…पाकिस्तानचा भूगोलच बदलून टाकू, राजनाथ सिंह यांचा थेट इशारा
Rajnath Singh on Dasara 2025 : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी विजयादशमीच्या निमित्तानं पाकिस्तानला गंभीर इशारा दिला. सर क्रीक भागात पाकिस्तान कुरापती करत असल्याबाबत त्यांनी पाकला ठणकावले.

Rajnath Singh Warn Pakistan : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी विजयादशमीच्या निमित्ताने गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकने भारताची संरक्षण कवच भेदण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय लष्कराने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सर क्रीक भागात पाकिस्तान कुरापती करत असल्याबाबत त्यांनी पाकला मोठा इशारा दिला. जर पुन्हा आगळीक केली तर पाकिस्तानचा नकाशाच बदलवू असा सज्जड दम त्यांनी भरला.
संरक्षणमंत्री विजयादशमीच्या निमित्त गुजरातच्या कच्छ येथे शस्त्र पुजनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी यानंतर भारतीय लष्कराला संबोधित केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या लेहपासून ते सर क्रीकपर्यंत पाकिस्तानने भारताचे संरक्षण कवच भेदण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तर भारताच्या लष्कराने पाकला जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिमचा फज्जा उडवला. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणं नेस्तनाबूत केले याची आठवण यावेळी संरक्षणमंत्र्यांनी करून दिली.
सर क्रीक परिसरात पाकच्या कुरापती वाढल्या
“स्वातंत्र्याला 78 वर्षे पूर्ण झाले आहे. पाक पुन्हा कुरापती करत आहे. सर क्रीक परिसरात नियंत्रण रेषेविषयी वाद उभा करण्यात येत आहे. भारताने अनेकदा चर्चेच्या माध्यमातून समाधान काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानच्या नियतीत खोट दिसत आहे. पाकिस्तानचे मनसुबे चांगले नाही. पाकिस्तानच्या लष्कराने सर क्रीक नियंत्रण रेषेलगत लष्करी सामग्री आणि विकासाचे काम वाढवले आहे.” असे राजनाथ सिंग यांनी सांगितले.
पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल बदलणार
भारतीय नियंत्रण रेषेवर लष्कर तैनात आहे. बीएसएफसह येथे लष्कर तैनात आहे. जर सर क्रीक भागात पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहिल्या. त्यांनी या भागात कुरबुरी वाढवल्या तर मग पाकला जशाच तसे उत्तर देण्यात येईल. पाकचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला. तर कराचीचा मार्ग हा क्रीकमधून जातो हे लक्षात ठेवा असे संरक्षणमंत्र्यांनी पाकला ठणकावले. याप्रकरणी भारताची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
