AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळीत काळ्या कोळश्याच्या राखेमधून माफियांचं गुंडाराज; वाचा A टू Z इतिहास

गँग्स ऑफ वासेपूरच्या धनबादमध्ये काळ्या कोळश्यातून गुन्हेगारीचं पेव फुटलं. महाराष्ट्रातल्या परळीत त्याच काळ्या कोळश्याच्या होणार्‍या राखेमधून माफियांचं गुंडाराज जन्माला आलंय.

परळीत काळ्या कोळश्याच्या राखेमधून माफियांचं गुंडाराज; वाचा A टू Z इतिहास
| Updated on: Dec 30, 2024 | 10:44 PM
Share

अस्तनीतल्या निखाऱ्यांप्रमाणेच सरकारी धोरणाच्या उणिवातून ही गुन्हेगारीची ठिणगी पडली. बघता-बघता ही ठिणगी विस्तव आणि पुढे आगीचा वणवा होऊन बसली. काळ्या कुट्ट राखेतून धनदांगडे गब्बर पुढे आले आणि त्याच राखेनं दादागिरीचा भस्म लावून राखमाफिया उगवले. परळीतल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाबाहेरची ही दृश्यं पाण्याच्या तळ्याची नाहीत. तर राखेच्या तळ्याची आहेत. औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून कोळसा जाळून तयार झालेली ही राख इथं टाकली जाते. राखेच्या धुराचे लोट तयार होऊ नयेत म्हणून पाईपातून पाण्याद्वारेच ती टाकले जाते. परळीतल्या राखेचं अर्थकारणाआधी याला गौडबंगाल का म्हटलं जातंय? ते सविस्तर समजून घेऊयात.

1971 ला परळीत कोळश्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरु झाला. आजही इथून वर्षाला सरासरी 1380 ते 1400 मेगावॅट वीज सुरु होते. दगडी कोळशाची ट्रेन थेट प्रकल्पात येवून कोळसा उपसते. कोळसा पेटवून वीजेची निर्मिती केली जाते. जळालेल्या कोळसातून 2 प्रकारची राख तयार होती. एक ओली राख आणि दुसरी कोरडी राख.

कोळसा जळताना जी राख होते, ती पाण्याच्या सहाय्यानं या पाईपातून बाजूच्या तळ्यात टाकली जाते. तिलाच ओली राख म्हणतात. दुसरीकडे चिमणीतून धुरावेळी जी राख तयार होते, तिला कोरडी राख म्हणतात. यापैकी ओली राख ही वीटभट्टी, राखेच्या वीटा, सिमेंट तयार करताना वापरली जाते. तर उच्चदर्जाची कोरडी राख ही विटांसह ओलं क्राँक्रिट-रंग आणि काही कॉस्मेटिकमध्येही वापरतात. पाईपद्वारे तळ्यात सोडल्या जाणाऱ्या राखेजवळ आधीपासूनच पोकलेन-जेसीबी तयार असतात. वरुन पाणीमिक्स राख पडते. तीच राख थेट जेसीबीतून ट्रकमध्ये आणि ट्रकमधून वीटभट्ट्यांपर्यंत पोहोच केली जाते.

राखेवर माफियांची नजर गेली कशी?

ही राख तशी सरकारची प्रॉपर्टी आहे. मात्र 2008/ 2010 पर्यंत राख कमाईचं साधन म्हणून ओळखली जात नव्हती. राख घेणारच कुणी नव्हतं म्हणून सरकारनं ना राख विकण्याचं धोरण आखलं, ना ही लिलाव केला. पुढे बांधकामं वाढल्यानं विटभट्ट्या वाढल्या. माती कमी पडू लागल्यानंतर विटांमध्ये राख मिक्स करणं सुरु झालं. कालांतरानं तर थेट राखेच्याच विटा आल्या. सिमेंटमध्येही राख मिस्क करण्याचा ट्रेंड सुरु झाला. तिथूनच राखेवर माफियांची नजर गेली आणि त्यानंतर या राखेच्या डोंगरांना मोठ-मोठे पोकलेन आणि जेसीबी लावून पोखरणं सुरु झालं.

एकट्या परळीत 1200 वीटभट्टया

माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी ट्रकभर राख विटभट्टीवाल्यांना 200 ते 600 रुपयांना मिळायची. आता एक ट्रक राख परळीत 8 हजारांना विकली जाते. या एका आयवा गाडीत अंदाजे 6 ब्रास राख मावते. पाणी मारलेली राख इतकी दाबून भरली जाते की प्रचंड क्षमतेची हायवा सुद्धा चढावर पुढे सरकत नाही. 6 ब्रास राखेतून किमान 6 हजार राखेच्या विटा तयार होतात. राखेची एक वीट ६ ते ७ रुपयांना मिळते म्हणजे सरकारच्या ८ हजाराच्या राखेतून 2 लाख 52 हजारांच्या वीटा तयार होतात. एकट्या परळीत 1200 वीटभट्टया आहेत. त्यापैकी अनेक बेकायेदशीर असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होतोय. इथून राज्यभरच नव्हे तर थेट हैद्राबादपर्यंत वीटांचा पुरवठा होतो.

ना कुठली पावती, ना कुठलं टेंडर, ना कोणता लिलाव

आकडेवारी ऐकून तुमचं डोकं काम करणार नाही पण इथं बीडची कायदा-सुव्यवस्था चव्हाट्यावर येण्याआधी 200 ते 300 पोकलेन आणि ६०० हून अधिक ट्रकमधून राखेची वाहतूक होत होती. ना कुठली पावती, ना कुठलं टेंडर, ना कोणता लिलाव… आरोपांनुसार इथल्या राखेसाठी कानावर बंदूक लावून कायदा-सुव्यवस्थेचीच राखरांगोळी केली जाते. राख वजनानं जितकी हलकी आहे, तितकंच वजनदार आहे तिचं अर्थकारण.

स्थानिक अभ्यासकांच्यानुसार, राखेतून उभ्या राहिलेल्या साऱ्या अर्थकारणाची वार्षिक उलाढाल तब्बल १ हजार कोटींच्या घरात आहे. म्हणजे एका दिवसात फक्त राखेतूनच दोन ते सव्वा दोन कोटींची व्यवसाय होतो. ज्यातला एक छदाम तरी सरकारच्या तिजोरीत जातो का? याबाबत साशंकता आहे. आत्ताही राज्यभर इतकी बोंब होऊनही इथं काही पोकलेन, जेसीबी आणि ट्रक होते. आमची टीम पोहोचल्यानंतर काही गाड्या इथून निघून गेल्या. आरोपांनुसार, ही साखळी बेकायदा वाहतुकीतून जन्माला आली. त्यातून पाण्यासारखा पैसा हाती खेळू लागला. त्याच पैशातून हत्यारं बाळगणं, दमदाटी करुन यंत्रणेला आव्हान देणं सुरु झालं.

2020 मधल्या एका रिपोर्टनुसार, राखेच्या वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या 4 हजार झाडांची कत्तल केली गेली. कुणाचाही धाक नसलेल्या माफियांनी उघड्या ट्रकमधून राख नेणं सुरु केल्यानंतर इथल्या अनेक लोकांना त्वचेचे आणि श्वसनाचे आजार झाले. 2022 मध्ये यावरुन किरकोळ कारवाया झाल्या. त्यावेळी राखेच्या वाहतुकीनं झालेल्या धुरामुळे रस्त्यावरची वाहनं दिसणं बंद झालं होतं. गुन्हेगारीचा जन्म अवैध धंद्यांतून होतो. त्यामुळे बेकायदेशीर आणि दमदाटीच्या अर्थकारणाच्या या राखेत कुणाकुणाचे हात काळे झालेत? त्याचाही छडा लागणं गरजेचं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.