AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तरी तुम्ही मला मतदान का करणार नाही?; पंकजा मुंडेंचा मतदारांना थेट सवाल

Pankaja Munde Parli Sabha Full Speech for Beed Losabha Election 2024 : पंकजा मुंडे यांची बीडच्या परळीत सभा झाली. तेव्हा स्थानिकांसमोर पंकजा मुंडे यांनी खंत बोलून दाखवली. तुम्ही मला मतदान का करणार नाही?, असा सवाल पंकजा यांनी बीडवासीयांना विचारला. वाचा सविस्तर...

...तरी तुम्ही मला मतदान का करणार नाही?; पंकजा मुंडेंचा मतदारांना थेट सवाल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 11, 2024 | 7:46 PM
Share

महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडच्या परळीत सभा झाली. यावेळी पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना काही सवाल केले. एक पंकजा मुंडे महाराष्ट्रात दहा ठिकाणी सभा घेऊन आली. माझ्या एका सभेने जर इतर ठिकाणचे खासदार निवडून येत असतील तर तुम्ही मला मतदान का करणार नाही? मी विकास केला की नाही मी विकास करताना जातिवाद केला का? मी कधी जात-पात पाहिली का? माझ्यासमोर येणाऱ्या व्यक्तीला आम्ही कधी जात विचारले का?, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

जातीपातीचे विष पेरण्याचं काम काही शक्ती करत आहेत. परंतु त्याला बळी पडू नका. या भागाच्या विकासासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. प्रभु वैद्यनाथाची ही सावली दूर करू नका. प्रत्येक बूथ मजबूत करा. मी मजबूत विकास दिल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

लोकांना भूलथापा मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुस्लिम बांधवांना भीती घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र कोणत्याही मुस्लिम बांधवांनी घाबरायची गरज नाही. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आम्ही बहिण-भाऊ मिळून सर्व जाती धर्मांना सर्व समाजांना सोबत घेऊन दोघं एकत्र मिळून वाटचाल करू. आपल्या भागाचा विकास करू राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानते. 13 तारखेला मला मतदान करा. अशी विनंती, असंही पंकजा मुंडे या सभेत म्हणाल्या.

पंकजा मुंडेंचं भावनिक आवाहन

चार जुनला आपला निकाल आहे. मी याच हातांनी चार जूनला मुंडे साहेबांचा अंत्यविधी केलेला आहे. आपण खरंतर त्या वेळेला मुंडे साहेबांचा सत्कार करणार होतो. अख्खी परळी त्यासाठी सजली होती. तो सत्कार झालाच नाही. त्या सोहळ्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं तमाम परळीकरांचे प्रेम नियतीने हिरावून घेतलं. आता पुन्हा चार जून हीच तारीख काळाने आपल्यासमोर आणली आहे. हे अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची ही संधी आहे, असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी मतदारांना केलं.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना