अमोल कोल्हे बैठकांना नसायचे, संसदेत जात नव्हते; अजित पवारांकडून आरोपांची राळ
Ajit Pawar on Amol Kolhe Shirur Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमोल कोल्हे हे संसदेत हजर नसत, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. तसंच इतर मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर वारंवार टीका करताना दिसतात. आजही पुण्यात बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे. जो माणूस राजीनामा द्यायाला निघाला होता. जो अभिनेता आहे, ज्यांनी पाच वर्षे काम केलं नाही. अमोल कोल्हे संसदेत जात नव्हते. कधी बैठकीला येत नव्हते. सांगायचे की दादा माझं शूटिंग सुरू आहे. मला यायला जमणार नाही. ते कलाकार आहेत. त्यांना तुम्हाला वेळ द्यायला जमणार नाही. मला आधी म्हणाले होते की आता निवडणूक लढणार नाही. पण आता पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
पुणे वाढतंय त्यामुळे राहायला जागा पुरत नाही म्हणून मला आता तिसरं पुणे म्हणजेच तिसरी महापालिका निर्माण करायची आहे. मी अधिकाऱ्यांना सर्वे ही करायला सांगितलं आहे. लोकांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेऊ…, असं अजित पवारांनी म्हटलं.
पुणे मेट्रोवर भाष्य
मित्रांनो, आपण एकमेकांना चांगलं ओळखतो. वाहतुकीची समस्या सोडवायची असेल तर रिंगरोड हा झालाच पाहिजे आणि पालकमंञी या नात्याने मी तो पूर्ण करणारच… रिंगरोडसाठी 10 स्वतंत्र टेंडर काढले आहेत. भूसंपादनालाही चार पट मोबदला देतोय. मेट्रोचीही कामं वेगानं सुरू आहेत. ही मेट्रो पुण्याच्या चहूबाजुला मला चारही मतदारसंघात न्यावी लागेल. आणि त्यासाठीच आपल्याला केंद्र सरकारच्या विचाराचा खासदार आपल्याला द्यावा लागेल. नरेंद्र मोदी हे विकास पुरूष आहेत. त्यांचे हात आपल्याला बळकट करावे लागतील, असं अजित पवार म्हणाले.
निधीलक अजित पवार काय म्हणाले?
पुण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण आता मुळशी धरणातूनही पाणी मागणार आहोत. आताचे खासदार राजीनामा देणार होते. काल राज ठाकरे यांनी सांगतील की अजित पवारांनी कधीच जातीपातीच राजकारण केलं नाही. मला ते आवडत नाही. खोट्या नाट्य प्रचाराला बळी पडू नका. सगळं निधी आणतो. आम्ही मोदींना सांगू की मोदीसाहेब पुण्याने चारही आपले खासदार निवडून दिले आहेत. निधी द्या, असं अजित पवारांनी म्हटलं.
