Beed Govind Barge: गोविंद बर्गे प्रकरणात मोठी अपडेट! नर्तिका पूजा गायकवाडची नवरात्र तुरुंगातच जाणार, कोर्टात आज काय घडलं?
Beed Govind Barge Case: बीडचा माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नर्तकी पूजा गायकवाडची संपूर्ण नवरात्र ही तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. आजा कोर्टात नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया...

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. बीड जिल्हातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad)सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून स्वत:ला संपवले. गोविंदने पूजाच्या घराबाहेरच उभ्या केलेल्या गाडीत स्वत:ला गोळी मारुन घेतली. त्यांच्या आत्महत्येने बीड जिल्ह्यात खळबळ माजली. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. नर्तकी पूजा गायकवाडच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पूजाच्या अडचणीत वाढ
गोविंद बर्गेच्या आत्महत्येनंतर मेहुण्याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पूजा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली. तिला गेल्या काही दिवसांपासून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. आता संशयित आरोपी पूजा गायकवाडला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तिची ही न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची आहे. त्यामुळे येणारी नवरात्र ही पूजाला न्यायलयीन कोठडीत घालवाली लागणार आहे.
वाचा: पूजानं टाळलं, आईलाही दया आली नाही; गोविंदचा शेवटचा फोन… आतापर्यंतची A टू Z अपडेट वाचा
बार्शी न्यायालयाने दिला निकाल
गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी नर्तिका पूजा गायकवाडला आत्तापर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज अखेर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड या दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर बार्शी न्यायालयाने हा निकाल जाहीर केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
एका कला केंद्रात गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर गोविंद आणि पूजामध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. गोविंद हा विवाहीत आहे, त्याला एक मुलगा आहे हे माहिती असूनही पूजासोबत त्याचे प्रेम प्रकरण सुरु होते. गोविंदने पूजाला अनेक महागडी गिफ्ट्स दिले होते. त्यानंतर त्याने गेवराई येथे एक भव्य बंगाल उभारला होता. या बंगल्यात गोविंद त्याची पत्नी, मुले आणि वडिलांसोबत राहत होता. हा बंगला पूजाला आवडला. तिने तो नावावर करुण देण्याचा हट्ट केला. गोविंदला ते शक्य नव्हते. पूजाने शेवटी त्याला धमकी दिली, तिने बोलणं देखील बंद केलं. गोविंदने बरेच प्रयत्न केले शेवटी त्याने टोकाचे पाऊल उचलले.
