AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कराड समर्थकांच्या अंगात आले, घोषणा देताना महिला घुमू लागल्या… नेमकं काय घडलं

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर महाराष्ट्रासह देशाचे वातावरण ढवळून निघाले असताना या प्रकरणातील आधी खंडणी प्रकरणात सीआयडीच्या स्वाधीन झालेल्या वाल्मीक कराड याच्यावर अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून त्यांनाही मोक्का लावण्यात आला आहे. त्यानंतर परळी आणि पांगरी, बीड परिसरात आज दिवसभर दोन्ही बाजूंनी आंदोलने झाली.

कराड समर्थकांच्या अंगात आले, घोषणा देताना महिला घुमू लागल्या... नेमकं काय घडलं
Protest by women in support of Valmik Karad, accused in Santosh Deshmukh murder case, in Pangri village
| Updated on: Jan 15, 2025 | 9:05 PM
Share

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या प्रकरणात अखेर मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर खूनाचा गुन्हा आणि मोक्का देखील दाखल केला आहे. केज येथून वाल्मीक कराड यांना आज बीड न्यायालय़ात हजर करण्यात आले आहे. या दरम्यान, परळीचे व्यवहार गेली दोन दिवस कराड यांच्या समर्थकांनी बंद पाडले आहेत. कराड समर्थकांनी जाळून घेण्याचा देखील प्रयत्न काल झाला होता. या प्रकरणात आज वकीलांमध्येच फूट पडली. आणि दोन्ही पक्षाचे वकील या प्रकरणात तावातावाने मीडियासमोर आपली बाजू मांडू लागल्याचे विचित्र चित्र राज्यातील जनतेला पाहायला मिळाले. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे वकील एकमेकांना स्टंटबाज म्हणू लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यातच पांगरी या गावात कराड समर्थ महिलांच्या तर अंगात आल्याचे चित्र पहायला मिळाले.

येथे पाहा पोस्ट –

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरणातून ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात आठ आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आला होता. आता थेट वाल्मीक कराड यांच्यावरच खूनाचा गुन्हा आणि मोक्का लावण्यात आल्याने कराड समर्थकांनी प्रचंड गोंधळ घातला. या निर्णयाच्या निषेध करण्यासाठी गेले दोन दिवस परळी बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी वाल्मीक कराड यांना दुपारी केज येथून बीड कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कराड यांना सात दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वाल्मीक कराड याच्या कोर्टात सुनावणी सुरु असताना कोर्टाच्या बाहेर वकीलांमध्ये चांगलीच जुंपली. २२ जानेवारीला पुन्हा कराडला कोर्टात आणले जाणार आहे. यावेळी कोर्टाच्या बाहेर महिला वकीलांनी संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी घोषणाबाजी केली.  या वेळी कराड समर्थक वकीलांनी  आमचा आण्णा देव माणूस असल्याचे म्हटले. तसेच या महिला वकीलांचा निषेध करीत ही स्टंटबाजी खपवून घेतली जाणार नाही, आम्हालाही संविधानाने बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.

महिलांच्या अंगात आले…

वाल्मीक कराड यांना सात दिवसांची पोलिस कोठडी दिल्याने त्यांच्या पांगरी गावात महिलांनी अक्षरश: थैमान घातले. या महिला आमच्या आण्णाला न्याय द्या असे म्हणत रस्त्यावर पडून डोके बडवून घेत होत्या. त्यावेळी काही महिलांना तर अक्षरश: अंगात आले. या महिला चक्क घुमू लागल्या. आमच्या आण्णांना न्याय मिळाला पाहीजेत, तुमच्याकडे काही सबूत नसताना त्यांना गुंतवले जात असल्याचा आक्रोश या महिला करताना दिसल्या. या प्रकरणात अज्ञातांनी टायर जाळून रोडवरील वाहतूक देखील बंद करण्याचा प्रयत्न केला. बीड न्यायालयात दोन्ही बाजूंचे वकील एकमेकांना भिडले तर पांगरी गावात महिलांना गाव डोक्यावर घेतल्याचे चित्र होते.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...