वाल्मिक कराडला कोण वाचवतंय? व्हिडिओ कॉलवर क्रूर हत्या पाहणारा आठवा आरोपी मकोका बाहेर कसा? अंजली दमानियांनी विचारला जाब

Anjali Damania on Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात एक महिन्यानंतर सात आरोपींना Mococa लावण्यात आला. वाल्मिक कराडला कोण वाचवतंय असा सवाल आता अंजली दमानिया यांनी केला आहे.

वाल्मिक कराडला कोण वाचवतंय? व्हिडिओ कॉलवर क्रूर हत्या पाहणारा आठवा आरोपी मकोका बाहेर कसा? अंजली दमानियांनी विचारला जाब
अंजली दमानिया, वाल्मिक कराड
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 4:13 PM

महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामधील सात आरोपींना मकोका लावण्यात आला. खून झाल्यापासूनच नाही तर त्याअगोदर सुद्धा हे आरोपी संघटित गुन्हेगारी करत असल्याचे समोर आले होते. पण आरोपींनी हे कृत्य कुणाच्या इशाऱ्यावरून केले यावरून आता पुन्हा वाद उफळला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, प्रकाशदादा साळुंके, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी संशयाची सुई थेट वाल्मिक कराडकडे वळवली आहे. आता तोच धागा पकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला धारेवर धरले आहे. वाल्मिक कराडला कोण वाचवतंय असा सवाल आता अंजली दमानिया यांनी केला आहे.

मग आठव्या आरोपीला कुणाचा वरदहस्त

अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून माहिती आहे की सात जणांनी खून केला, असे दमानिया म्हणाल्या. सात आरोपींवर मकोका लावला. पण आठव्या आरोपीला, जो व्हिडिओ कॉलवर अजून मारण्यास सांगत होता, तो कसा सुटला असा सवाल दमानिया यांनी केल. त्याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? त्याच्यावर कारवाई करण्याची हिम्मत शासनात नाही का? असा सवाल दमानिया यांनी केला. गृहमंत्रालयावर त्यांनी ताशेरे ओढले.

हे सुद्धा वाचा

गृहमंत्रालयाचे काढले वाभाडे

मे महिन्यापासून याप्रकरणात आवादा कंपनीकडून सुदर्शन घुले, विष्णू चाटेसह इतर आरोपींची नावे येत होती. तर त्याचवेळी कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला. मे महिन्यापासून ते डिसेंबर 2024 पर्यंत टाईमपास करण्यात आला. वेळीच कारवाई केली असती तर संतोष देशमुख जिवंत असते, असे त्या म्हणाल्या. इतके मोर्चे निघत आहेत. आक्रोश होत आहे. तेव्हा एका महिन्यानंतर सरकार उपकार केल्यासारख मोकाकाची कारवाई करत असल्याचा घणाघात त्यांनी घातला.

वाल्मीक कराड वाचवले जात आहे का?

वाल्मीक कराड हा सरकारचा जावई असल्यासारखा त्याला वागवला जात आहे, असे दमानिया म्हणाल्या. वाल्मीक कराड यांचं सगळ्यांबरोबर अगदी चांगलं गणित आहे. त्याच्यावर धनंजय मुंडे आणि काही प्रमाणात पंकजा मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. जोपर्यंत दबाव आहे, तोपर्यंत वाल्मिकवर मकोका लावण्यात येणार नाही असा आरोप त्यांनी केला.

'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.