AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय, घडामोडींना वेग

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे, मात्र आता त्यापूर्वीच घडामोडींना वेग आला असून, सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय, घडामोडींना वेग
| Updated on: Aug 22, 2025 | 9:12 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभारलं, त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.  त्यासाठी आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा मराठा बांधव एकत्र येणार आहेत. 29 ऑगस्टपासून मराठा बांधवांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर सुरुवात होणार आहे, त्यापूर्वीच 28 ऑगस्टला लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे.

हे आंदोलन गेल्या आंदोलनापेक्षा पाच पट मोठं असेल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक गावांना भेटी देखील दिल्या आहेत. अनेक दौरे केले. त्यानंतर आता 29 ऑगस्टपासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सरकारने मराठा उपसमितीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

मराठा उपसमितीचे अध्यक्ष बदलण्यात आले आहेत, पूर्वी चंद्रकांत पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते, आता राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत. सरकारकडून मराठा उपसमितीचं पुर्नगठण करण्यात आलं आहे. पूर्वी अध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे आता या समितीमध्ये सदस्य असणार आहेत. या समितीमध्ये एकूण  12 सदसस्य आहेत.

ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आता मराठा उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत, तर  चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे, भोसले, कोकाटे, मकरंद जाधव आणि बाबासाहेब पाटील हे सर्व मराठा उपसमितीचे सदस्य असणार आहेत.  ही समिती मराठा समाजाच्या शौक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबतचा आढावा घेत राहणार आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच सरकारकडून मराठा उपसमितीचं पुर्नगठण करण्यात आलं आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाला सुरुवात होणार आहे, मात्र त्यापूर्वीच मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!