मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेना, महिला आक्रमक थेट…
लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला असून थेट राज्यात महायुतीचे सरकार आले. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून महिलांना हप्ता मिळाला नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. विशेष म्हणजे या योजनेचा थेट फायदा झाला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहिन्याला 1500 हजार रूपये मिळतात. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा थेट भाजपा महायुतीला झाला आणि महिलांनी थेट भरघोष मतदान महायुतीला केले. राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाची आली. दरमहिन्याला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बॅंक खात्यात 1500 रूपये येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, ही लाडकी बहीण योजना बंद होईल. त्यानंतर सरकारकडून सांगण्यात आले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा लोड वाढल्याचे सांगताना अर्थमंत्री अजित पवार दिसले. इतर विभागाचे पैसे या लाडकी बहीण योजनेसाठी वापरली जात आहेत.
राज्यात कालच 29 महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला. महापालिकेच्या निवडणुकीतही अनेक पक्षांकडून लाडकी बहीण योजनेचा मुद्दा मांडला गेला. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नसल्याने भंडाऱ्यात महिलांचा चांगलाच संताप हा बघायला मिळाला. फक्त हेच नाही तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसल्याने महिलांनी मुंबई कोलकाता महामार्ग रोखला.
Municipal Election 2026
Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलंय..
Maharashtra Municipal Election Results 2026 : शर्मिला ठाकरे यांचा पराभवानंतर मोठा खुलासा...
प्रखर विरोधक म्हणून काम करणार - अंकित सुनील प्रभू
Mumbai Election Result 2026 : लोकांनी डोळे उघडले पाहिजेत - शर्मिला ठाकरे
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
भंडारा जिल्ह्यातील महिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने थेट रस्त्यावर उतरल्या. यावेळी त्यांनी निर्देशन करत काही वेळ मुंबई कोलकाता महामार्ग रोखला. राज्यात महापालिकांच्या निवडणुकीची आचारसहिंता होती. शिवाय कॉंग्रेसने निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना हप्ता न देण्याकरिता एक याचिका दाखल केली होती, त्यांनी हस्तक्षेप यावर केला होता.
दोन महिन्यांपासून महिला लाडकी बहीण योजनेच्या हप्ताची वाट पाहत आहेत. मात्र, अजूनही खात्यात पैसे आले नाहीत. शेवटी महिला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या. पोलिसांनी महामार्ग रोखणाऱ्या महिलांना काहीवेळात बाहेर काढले. नक्की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार या प्रश्न सरकारला लाडक्या बहिणींकडून सातत्याने विचारला जात आहे. मात्र, सरकाकडून यावर भाष्य करण्यात आले नाही.
