AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Crime | मोहाडीत बीअर बारमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, वर्चस्वाच्या वादातून काढले धारदार शस्त्र, जखमीवर रुग्णालयात उपचार

मोहाडीत युवराज बिअरबार आहे. याठिकाणी पिणारे बसत असतात. काल सायंकाळी दिनेशही तिथं गेला. त्याच बारमध्ये सचिन व महेश होते. यांच्यात जुना काही वाद होता. बारमध्ये हा वाद उफाळून आला. यात सचिन व महेशने दिनेशवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात दिनेश जखमी झाला.

Bhandara Crime | मोहाडीत बीअर बारमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, वर्चस्वाच्या वादातून काढले धारदार शस्त्र, जखमीवर रुग्णालयात उपचार
मोहाडीत बीअर बारमध्ये तरुणावर प्राणघातक हल्लाImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 9:43 AM
Share

भंडारा : वर्चस्वाच्या वादात एका तरुणावर धारदार शस्त्राने (Sharp weapon) प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील युवराज बीअर बारमध्ये घडली. विशेष म्हणजे हल्लेखोर तरुण स्वत: मोहाडी ठाण्यात (Mohadi Thane) गेले. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. जखमीला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital at Bhandara) उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी दिनेश सायंकाळी मोहाडी येथील युवराज बीअर बारमध्ये गेला होता. त्याठिकाणी आरोपी सचिन व महेश आले. वर्चस्वाच्या लढाईत त्यांच्यात वाद झाला. या वादात सचिन व महेशने आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्राने दिनेशवर वार केले. यात त्याच्या मानेला आणि चेहऱ्याला जबर दुखापत झाली.

जखमीची प्रकृती चिंताजनक

जखमी दिनेशला तात्काळ मोहाडी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथून भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमी व हल्लेखोर गुंड प्रवृत्तीचे आहेत. हल्ला केल्यानंतर सचिन व महेश थेट मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी आपण हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. जखमीच्या बयानानंतर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.

अशी घडली घटना

मोहाडीत युवराज बिअरबार आहे. याठिकाणी पिणारे बसत असतात. काल सायंकाळी दिनेशही तिथं गेला. त्याच बारमध्ये सचिन व महेश होते. यांच्यात जुना काही वाद होता. बारमध्ये हा वाद उफाळून आला. यात सचिन व महेशने दिनेशवर सपासप वार केले. यात दिनेश जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर सचिन व महेश मोहाडी पोलिसांत गेले. आम्ही दिनेशला मारहाण केल्याचं सांगितलं. त्यामुळं पोलिसांना त्यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. इकडं दिनेश हा रुग्णालयात भरती आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. दिनेशला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.