तेजस मोहतुरे, प्रतिनिधी, भंडारा : भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील पवनी (Pavani) तालुक्यात एक दुःखद घटना घडली. एका सहा वर्षांच्या (6 year old girl died) चिमुकलीचा अचानक मृत्यू झाला. रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या या चिमुकलीला काही तरी चावलं असं वाटलं, म्हणून ती झोपेतून जागी झाली. तिनं आईला सांगितलं. बघता बघता या चिमुकलीचा पाय काळा पडला. आई-वडील चिमुकलीला घेऊन दवाखान्यात घेऊनही गेले. पण काही वेळातच तिचा मृत्यू झाल्यानं पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोटच्या मुलीचा मृत्यू झाल्याने तिच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसला. सर्पदशांमुळे या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आलीय.