Manoj Jarange : तर आम्ही सहन करणार नाही, आम्ही पण…मनोज जरांगेंना भरत गोगावलेंचा थेट इशारा; शिंदेंवर टीका केल्याने आक्रमक!
मनोज जरांगेंना एवढंच सांगतो की त्यांनी संयम ठेवावा. आमच्या मुख्य नेत्यावर घसरू नये. तो जर बोलला तर एकही मराठा नेता गप्प बसणार नाही, त्याला ऊत्तर देईल... मराठा समाजासाठी एकनाथ शिंदे यांनी अनेक निर्णय घेतला आहे, असा इशारा भरत गोगावलेंनी दिला.

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. काहीही झालं तरी सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मी माझे उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये त्यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणाला बसलेले असताना मनोज जरांगे चांगलेच आक्रमक होत आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आहेत. आता बदला घेण्याची वेळ आली आहे. तीन वर्षांपासून आमच्यावर अन्याय होतोय, आता बदला घेण्याची वेळ आली आहे, असा इशारा मोदींनी दिलाय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना टार्गेट केल्यामुळे शिंदे गटाचे नेते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंत्री भरत गोगावले यांनी तर जरांगे यांना थेट इशारा दिलाय. आमच्या नेत्याला लक्ष्य केलं जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मनोज जरांगेंवर आक्षेप व्यक्त केलाय.
तर आम्ही सहन करणार नाही
मनोज जरांगेंना एवढंच सांगतो की त्यांनी संयम ठेवावा. आमच्या मुख्य नेत्यावर घसरू नये. तो जर बोलला तर एकही मराठा नेता गप्प बसणार नाही, त्याला ऊत्तर देईल… मराठा समाजासाठी एकनाथ शिंदे यांनी अनेक निर्णय घेतला आहे. त्यांनी कधीही मागेपुढे पाहिलं नाही. मराठा समाजाचे 57 मोर्चे निघाले. या मोर्चांना सामोरं जाण्याचं काम त्यांनी केलं. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत, ते सगळं ठिक आहे. परंतु आमचे ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविषयी बोलत असतील तर कोणताही मराठा सहन करणार नाही. आम्ही पण मराठे आहोत, असा थेट इशाराच भरत गोगावले यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका
भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. वाघाने अजूनही वाघनखं काढलेली नाहीत, असे विधान उद्धव ठाकरेंनी केले. त्याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे ना नखे राहीलीत ना वाघ राहिला. बाळासाहेब होते तोपर्यंत सगळं होतं. पण आत्ता काही राहिलं नाही, त्यांनी आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये असा हल्लाबोल गोगावले यांनी केला.