Ajit Pawar plane crash : आता शिंदे गटाच्या बड्या नेत्यालाही अजितदादांच्या विमान अपघातावर संशय, वक्तव्यानं मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून या अपघातावर संशय व्यक्त करण्यात येत आहे, त्यातच आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं देखील मोठं विधान केलं आहे.

Ajit Pawar plane crash : आता शिंदे गटाच्या बड्या नेत्यालाही अजितदादांच्या विमान अपघातावर संशय, वक्तव्यानं मोठी खळबळ
Ajit Pawar plane crash
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 04, 2026 | 4:06 PM

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. विमान थेट जमिनीला धडकलं, घटनास्थळी मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. दरम्यान या अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे, अमोल मिटकरी यांनी सर्वात आधी या विमान अपघातावर संशय व्यक्त केला होता, त्यांनी या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे, अमोल मिटकरी यांच्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या विमान अपघातावर संशय व्यक्त केला, दरम्यान त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी देखील या अपघातावर संशय व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाले भरत गोगावले? 

अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला जात असतानाच आता मंत्री भरत गोगावले यांनीही प्रतिक्रिया देत संशय व्यक्त केला आहे. “अपघात सरळ दिसतोय, पण त्यांच्या लोकांनीच जर संशय घ्यायला सुरुवात केली, तर काहीतरी पाणी मुरतंय का हे बघावे लागेल.” अशी प्रतिक्रिया या अपघातावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे.

भुजबळ काय म्हणाले होते? 

दरम्यान भरत गोगावले यांच्यापूर्वी छगन भुजबळ यांनी देखील या अपघाताबद्दल बोलताना सशंय व्यक्त केला होता. विमानाने दुसऱ्यांना घिरटी मारली, त्यानंतर ते तिरपं कसं झालं? असा प्रश्न उपस्थित करतानाच मला वाटत रडारमध्ये किंवा आणखी काही प्रॉब्लेम असावा असं वाटतं, मी काही त्यामधला तज्ज्ञ नाही, चौकशी होईल, काय ते कारण समोर येईल, मात्र आपण सोन्यासारखा माणूस गमावला आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं होतं.