AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat : लिंगपिसाट खरातचा पाय आणखी खोलात, आता आर्थिक कुंडलीही येणार बाहेर… ‘ती’महत्वाची व्यक्ती पोलिसांच्या रडारवर

भोंदू बाबा अशोक खरातच्या लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणूक प्रकरणात मोठा खुलासा. खरातचा सीए पोलिसांच्या रडारवर आल्याने त्याची कोट्यवधींची माया आणि शिवनीका ट्रस्टचे व्यवहार उघड होतील. ट्रस्टची उलाढाल संशयास्पद वाढल्याने चौकशी तीव्र झाली आहे. तसेच, रुपाली चाकणकरांचीही एसआयटीकडून चौकशी होणार असून, यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat : लिंगपिसाट खरातचा पाय आणखी खोलात, आता आर्थिक कुंडलीही येणार बाहेर... 'ती'महत्वाची व्यक्ती पोलिसांच्या रडारवर
अशोक खरातची आर्थिक कुंडलीही बाहेर निघणारImage Credit source: TV9
| Updated on: Mar 30, 2026 | 10:52 AM
Share

ज्योतिष सांगतो, भविष्य घडवतो असे दावे करत महिलांना फसवून , त्यांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणारा, आर्थिक फसवणूक करत लोकांना लुबाडणारा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचा पाय आणखी खोलात गेल आहे. जवळपास 2 आठवड्यांपासून पोलिस कोठडीत असलेल्या अशोक खरातची पोलिसांकडून कसून तपासणी, चौकशी सुरू असून त्याच्याशी निगडीत लोकंही आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. लैंगिक अत्याचार करणाऱ्या खरताने अनेकांना फसवून, लुबाडून पैसे कमावले, मोठी माया जमवली, त्याची कोट्यवधींची संपत्ती, जमीन-जुमला देखील असल्याचे समोर आले आहे.

आता याच केसमध्ये आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे भोंदू बाबा अशोक खरातचा आर्थिक व्यवहार पाहणारा सीए हाही पोलिसांच्या रडावर आला आहे. खरातच्या 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर  SIT ची करडी नजर आहे. याच सीएकडून अशोक खरात याची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता आहे.  हा सीए फक्त खरातचे आर्थिक व्यवहार सांभाळत नव्हता तर तो शिवनीका संस्थानच्या आजी माजी सदस्यांचेही आर्थिक व्यवहार पाहायचा. त्यामुळे आता याच सीएची पोलिसांकडून कसून चौकशी होणार असून त्यामधून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. शिवनीका ट्रस्टच्या व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. अवघ्या 7-8 वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये या ट्रस्टची उलाढाला ही चार लाखांची होती, मात्र 2 वर्षांपूर्वी म्हणजेच, मे 2024 मध्ये या ट्रस्टने कोट्यवधींची झेप घेतली, त्यामुळे ट्रस्टच्या काराभारवर संशय ग़डद झाला आहे. त्यामुळे आता अनुषंगानेही पोलिसांतर्फे चौकशी करण्यात येणार आहेय

रुपाली चाकणकरांचीही होणार पोलिसांकडून चौकशी

भोंदू अशोक खरात याच्याशी असलेली जवळीक रुपाली चाकणकर यांना चांगलीच भोवल्याचे दिसत आहे. खरातचे कारनामे, त्याची काळी, अश्लील कृत्य समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्याअध्यक्षपदाचा राजीनामा द्यावाा लागला होता. खरातच्या अटकेनंतर त्याची आणखीही कृत्य उघडकीस आली, अनेक महिलांनी त्याच्याविरोधात आवाज उठवत आप्लयावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हेल्पलाइनवर फोन करून माहिती दिली. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढल्यावर चाकणकरांविरोधातील रोष आणईखनच वाढला आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला.

आता भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असून यामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचीदेखील चौकशी होऊ शकते. भोंदू अशोक खरात सोबत निगडित व्यक्ती आणि त्याच्या संस्थांच्या सदस्यांची चौकशी होणार आहे. रूपाली चाकणकर यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. चाकणकर यांच्यासह आजी-माजी सदस्यांना एसआयटी कडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता चाकणकरांच्या चौकशीतून आणखी काय माहिती समोर येते, उघड होत, ते पाहणं महत्वाचं ठरेल.

Follow Us
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं