AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी नजर ठेवली, मग संधी साधली, स्वत:च कुटुंबासोबत…; नसरापूर अत्याचार प्रकरणातील मन सुन्न करणारा घटनाक्रम

नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा सविस्तर घटनाक्रम समोर आला आहे. आरोपी भीमराव कांबळे याने कामाच्या ठिकाणी राहून पाच दिवस चिमुकलीवर नजर ठेवली होती. गुन्हा केल्यानंतर तो चक्क ग्रामस्थांसोबत शोधकार्यात सामील होऊन दिशाभूल करत होता. वाचा सविस्तर बातमी.

आधी नजर ठेवली, मग संधी साधली, स्वत:च कुटुंबासोबत...; नसरापूर अत्याचार प्रकरणातील मन सुन्न करणारा घटनाक्रम
Bhor Nasrapur case
| Updated on: May 06, 2026 | 1:11 PM
Share

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका ४ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली असून त्याला फाशी द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. आता सध्या त्याची याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान एक धक्कादायक वास्तव समोर आले असून ते अतिशय संतापजनक आहे. आरोपीने भीमराव कांबळेने वासनेपोटी एका निष्पाप बालिकेचे आयुष्य उद्ध्वस्त केले नाही, तर गुन्हा लपवण्यासाठी त्याने बनाव करत पोलिसांनाही चक्रावून टाकणारा बनवा केला आहे.

पाच दिवसांपासून रचला जात होता डाव

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, भीमराव कांबळे हा गेल्या ५-६ दिवसांपासून घटना घडलेल्या गोठ्यातच मुक्कामाला होता. त्याला या परिसरात विटा उचलण्याचे काम मिळाले होते. त्यामुळे त्याने आपले अंथरुण, कपडे आणि इतर साहित्य याच गोठ्यात ठेवले होते. या गोठ्याच्या परिसरात चिमुकली रोज खेळायची, त्याच ठिकाणी आरोपी काम करत होता. कामाच्या बहाण्याने तो तीन-चार दिवसांपासून त्या चिमुकलीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून होता.

शुक्रवारी १ मे रोजी विटा उचलण्याचे काम पूर्ण झाले होते. आता तिथून निघण्याची वेळ आली असताना आरोपीने आपला क्रूर डाव आखला. त्याने खेळणाऱ्या चिमुकलीला जवळ बोलावून तिला गाठी शेव खाऊ घालण्याचे आमिष दाखवले. खाऊच्या बहाण्याने तो तिला गोठ्याच्या निर्जन कोपऱ्यात घेऊन गेला. तिथे या नराधमाने चिमुकलीवर अमानुष अत्याचार केले. या कृत्यानंतर चिमुकलीची प्रकृती खालावली असतानाही आरोपीने तिला तसेच सोडले आणि तो तिथून बाहेर पडला.

मुलीचा शोध घेण्याचा बनाव रचला

यानंतर काही वेळाने मुलीच्या घरच्यांना ती सापडत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळातच ग्रामस्थ तिथे जमा झाले. त्यांनी शोधाशोध सुरू झाली. यावेळी स्वतःला वाचवण्यासाठी आरोपीने अत्यंत थंड डोक्याने चाल खेळली. तो स्वतः ग्रामस्थांमध्ये सामील झाला आणि मुलगी कुठे गेली असेल? असे विचारत त्यांच्यासोबत शोध घेऊ लागला. काही वेळ तो नातेवाईकांसोबत तिला शोधत होता. त्यामुळे कोणालाही त्याचा संशय आला नाही.

यानंतर ग्रामस्थांनी आपला मोर्चा गोठ्याकडे वळवला. जसे काही लोक गोठ्याच्या अगदी जवळ पोहोचले, तेव्हा भीमराव कांबळेच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आपले पाप आता उघड होणार हे ओळखून, त्याने गर्दीचा फायदा घेत तिथून पळ काढला. त्याच्या अचानक पळून जाण्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यातच गोठ्यात तपास केला असता पीडित चिमुकली अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आली.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. भोर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर पोक्सो (POCSO) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले