AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, ‘ते’ प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश

राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. भुजबळांविरोधातील 2021 च बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहे.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, 'ते' प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश
Chhagan Bhujbal
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 16, 2025 | 11:10 PM
Share

राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. भुजबळांविरोधातील 2021 च बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहे. याआधीचा खटला रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचं विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांची अडचण वाढणार

मुंबई आणि नाशिक येथील बेनामी मालमत्तांप्रकरणी भुजबळ कुटुंबीयांविरुद्ध आयकर विभागाने 2021 मध्ये कारवाई सुरू केली होती या प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समन्स बजावलं होतं. मात्र सत्र न्यायालयाच्या आदेशाला भुजबळ कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये उच्च न्यायालयाने खटला रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर आधारित असल्याचे म्हणत विशेष न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायाधीशांनी आदेशात काय म्हटले?

खासदार/आमदारांच्या प्रकरणांसाठी असलेले विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी खटला पुन्हा सुरु करण्याचे आदेश देताना म्हटले की, ‘उच्च न्यायालयाने खटला रद्द करताना या प्रकरणातील तथ्ये किंवा खटल्याच्या गुणवत्तेचा विचार केला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन केल्यानंतर खटला रद्द करण्याचा निर्णय केवळ तांत्रिक आधारावर देण्यात आला होता.’

आता खटला पुन्हा सुरु होणार

विशेष न्यायालयाने पुढे म्हटले की, ‘उच्च न्यायालयाने अभियोक्त्यांना त्यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्यास कार्यवाही पुन्हा सुरू करण्याची स्वातंत्र्य दिले आहे. त्यात म्हटले आहे हा खटला केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वसूचनेच्या आधारावर रद्द करण्यात आली होती, गुणवत्तेच्या आधारावर नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने (अभियोक्त्याची) पूर्वसूचना स्वीकारली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय रद्द करण्यात आला असून आता खटला पुन्हा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...