मोठी बातमी! महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत मोठा भूकंप, अजितदादांना पहिला मोठा हादरा, बड्या नेत्यानं सोडली साथ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, बड्या नेत्यानं अजित पवार यांची साथ सोडली आहे.

मोठी बातमी! महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत मोठा भूकंप, अजितदादांना पहिला मोठा हादरा, बड्या नेत्यानं सोडली साथ
अजित पवार
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 20, 2026 | 6:29 PM

महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत, या निवडणुकीमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलं आहे, भाजपाचे राज्यात सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप हा नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीमध्ये देखील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला देखील मोठं यश मिळालं आहे. शिवसेना शिंदे गट राज्यात दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे.  महापालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची आणि भाजपची युती होती, त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना झाल्याचं पहायला मिळालं, मात्र दुसरीकडे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटानं भाजप किंवा शिवसेना शिंदे गटासोबत युती न करता महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवल्यानं पक्षाला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळत आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली होती, या दोन्ही महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले होते. मात्र तरी देखील पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला म्हणावं तसं यश मिळालं नाही, या दोन्ही महापालिकेत भाजपची सत्ता आली. केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला महापालिका निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील मोठा धक्का बसला.

दरम्यान आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील जाहीर झाल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाला पहिला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र गावडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  गावडे हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जातात, ते माजी आमदार पोपराव गावडे यांचे चिरंजीव आहेत.