AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिंदेंचा अजितदादांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! शिंदेंचा अजितदादांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच घडामोडींना वेग
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2025 | 9:29 PM
Share

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काही अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती देखील होतील, मात्र आमच्यासाठी पहिला पर्याय हा महायुतीच असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र दुसरीकडे शनिवारी जळगावमध्ये बोलताना भाजपसोबतच्या युतीबाबत शिवेसनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.  त्याच प्रमाणे  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून देखील काही दिवसांपूर्वी स्वबळाचे संकेत देण्यात आले आहेत, त्यामुळे या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच आता दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सदस्य दया पवार यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश  पार पडला. या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्हा हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बाल्लेकिल्ल्यात आता शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला हादरा देण्यात आला आहे. या पक्ष प्रवेशामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वारज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सुनील तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार