मोठी बातमी! ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, त्यासोबतच आता पक्षांतराला देखील वेग आला आहे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून, मोठ्या नेत्यानं अजित पवार यांची साथ सोडली आहे.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2025 | 2:42 PM

निवडणूक आयोगाकडून दोन दिवसांपूर्वी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी आता पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पहायला मिळालं. हे पक्ष प्रवेश अजूनही सुरूच आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षांना लागलेली गळती महाविकास आघाडीसाठी डोकेदुखीचा विषय ठरली असतानाचा आता मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे जसं महाविकास आघाडीमधील नेते आणि पदाधिकारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत, त्याचप्रमाणे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे नेते देखील आपल्या मित्र पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहे, याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र यावेळी शिवसेना शिंदे गटानं राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहिल्यानगरच्या पारनेर दौऱ्यावर आहेत, यावेळी  अजित पवार गटाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माझी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुजित झावरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. सुजित झावरे यांचे वडील दिवंगत वसंतराव झावरे हे पारनेर तालुक्याचे माजी आमदार आहेत.

दरम्यान  अजित पवार यांच्या पक्षात डावल जात आहे, दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे,  एकनाथ शिंदे यांनी विकासाचा शब्द दिला त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला अशी प्रतिक्रिया या पक्षप्रवेशावेळी झावरे यांनी दिली आहे. झावरे यांचा पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.