
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगाचा जवळपास सर्वच पक्षांना मोठा फटका बसला आहे, मात्र त्याचा सर्वाधिक फटका या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला बसल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधल्या देखील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राज्यात आज निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीची घोषणा होताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश झाला आहे.
आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिकांसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. धुळ्याच्या माजी महापौर कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कल्पना महाले यांच्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक गुलाब माळी, कैलास मराठे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाले यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यानं शहरात आता भाजपाचं पारडं जड मानलं जात आहे.
दरम्यान आगामी महापालिका शक्य थिते युतीमध्येच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर पुण्यात मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते पक्षात घ्यायंच नाही, असंही महायुतीमध्ये ठरल्याची माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली.