AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीची घोषणा होताच महायुतीबात मोठी अपडेट, फडणवीसांनी दिला झटका, थेट घोषणाच केली!

राज्य निवडणूक आयोगाने ममहापालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर येत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी महायुतीसंदर्भात मोठी माहिती दिली आहे.

निवडणुकीची घोषणा होताच महायुतीबात मोठी अपडेट, फडणवीसांनी दिला झटका, थेट घोषणाच केली!
ajit pawar and devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 15, 2025 | 6:10 PM
Share

Pune Municipal Election : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर यासह एकूण 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात घडामोडी वाढल्या आहेत. इच्छुक उमेदवारांमध्येही लगबग वाढली आहे. राज्यात मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. याच निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथे महायुती नसेल आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

काही ठिकाणी शिवसेना, भाजपाची युती होणार

राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील महापालिका निवडणुकीवर भाष्य केले. आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा, शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीची युती होईल. एक-दोन ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादीचीही युती होताना दिसेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पुण्यात स्वतंत्रपणे लढणार

तसेच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बोलताना, पुण्यामध्ये अजित पवार आणि आमच्यात चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही पुण्यातील मोठे पक्ष आहोत. भाजपाने पाच वर्षे चांगल्या पद्धतीने पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना पाहायला मिळतील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. तसेच ही लढत मैत्रीपूर्ण असेल. यात कुठेही कटुता नसेल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुंबई महापालिकेत नेमके काय होणार?

दरम्यान, पुण्याबरोबरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे महायुतीमध्ये जागावाटप आणि युतीच्या विषयावर चर्चा चालू आहे. त्यामुळे आता पुढे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या....
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.