AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सातवा खासदारही फुटला? थेट मंत्रिपदाची मागणी?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. हे सर्व खासदार आता लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता एक मोठी बातमी आता समोर आली आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सातवा खासदारही फुटला? थेट मंत्रिपदाची मागणी?
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का? Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 19, 2026 | 4:23 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात रविवारी पक्षातील खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला प्रत्यक्षात 4 खासदारच उपस्थित होते, तर 5 खासदार हे ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा केला जात होता, तेव्हापासूनच राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर 6 खासदारांनी बंडखोरी केल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान त्यानंतर गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहावं यासाठी सर्व खासदारांसाठी व्हीप लागू करण्यात आला होता, मात्र तरी देखील 6 खासदारांनी या बैठकीला दांडी मारली.

दरम्यान हे सर्व बंडखोर खासदार आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. लवकरच या खासदारांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र आता या सर्व घडामोडी घडत असताना एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सनसनाटी दावा केला आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे. कदम यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा सातवा खासदारही फुटला आहे, तो मंत्रिपदाची मागणी करत होता, असा दावा कदम यांनी केला आहे, कदम यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, एवढंच नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा देखील कदम यांनी केला आहे. 2029 पर्यंत शिवसेना ठाकरे गटात आमदार देखील उरणार नाहीत, असा हल्लाबोल देखील यावेळी कदम यांनी केला आहे. दरम्यान कदम यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तो सातवा खासदार नेमका कोण? याची आता चर्चा सुरू झाली आहे. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे,  6 आमदार फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं