AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरमध्ये काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
नागपूर गोळीबारानं हादरलं Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 26, 2026 | 8:17 AM
Share

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरमधील काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. नागपुरच्या वाठोडा परिसरामध्ये शुभम मोटघरे यांचं घर आहे, त्यांच्या घरावर दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही, मात्र घराचं नुकसान झालं आहे. घराच्या काचा फुटल्या आहेत.

दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. हा गोळीबार का करण्यात आला? त्या मागं नेमकं कारण काय होतं? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन अज्ञान आरोपींकडून काँग्रेसचे नागपूरमधील नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेतील आरोपींचा शोध सुरू आहे.

या गोळीबाराबाबत नगरसेवक सुभम मोटघरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा मी बालकीनीमध्ये होतो, तेव्हा हा गोळीबार झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा, माझी पाच वर्षांची मुलगी ही देखील दरवाजामध्येच उभी होती. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाहीये, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. हल्लेखोर प्रचंड वेगाने आले, त्यांनी घरावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते लगेच पसार झाले. पोलिसांकडून आता या अज्ञात हल्लेखोरांचा तपास सुरू आहे. घराचे सीसीटीव्ही देखील चेक करण्यात आले आहेत. दोन तरुण मोपेडवर आले, ते अत्यंत वेगात होते. त्यांनी गोळीबार केला आणि ते निघून गेले, अशी माहिती यावेळी शुभम मोटघरे यांनी दिली आहे.

गोळीबाराचं कारण अस्पष्ट 

दरम्यान हा गोळीबार का करण्यात आला? त्या मागचं कारण काय होते? हे अजूनही अस्पष्ट आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Follow Us