AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, घडामोडींना वेग

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजप नेत्याने आपल्या पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, घडामोडींना वेग
भाजपला धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 6:10 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. विधान परिषदेच्या पाचही जागांवर कमी अधिक प्रमाणात बंडखोरी झाली आहे. मात्र दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीपूर्वीच आता भाजपला मोठा झटका बसला आहे. बड्या नेत्यानं आपल्या पक्षातील सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. एवंढच नाही तर त्यांनी थेट नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांना पाठिंबा देखील जाहीर केला आहे. अनिल सोले यांचं मुख्य प्रचार कार्यालय सुद्धा गिरीश व्यास यांच्या महाल परिसरातील कार्यालयात सुरू करण्यात येत आहे.

नेमकं काय म्हणाले गिरीश व्यास?   

अशी वेळ आली की मी माझ्या सहकारी आणि मित्राला अनिल सोले यांना शब्द दिला होता त्यामुळे मी राजीनामा दिला आणि माझं कार्यालय त्यांना दिलं.  तुमचं असं म्हणणं आहे का की अनिल सोले निष्ठावंत नाही? अनिल सोलेसुद्धा निष्ठावंत आहेत. ते शंभर टक्के निवडून येतील आणि ते भाजप सोबतच सहकारी म्हणून राहतील. अशा निवडणुकीच्या काळामध्ये पक्ष कारवाई करतो, शिस्तभंगाची कारवाई होईल म्हणून ती कारवाई होण्यापेक्षा मीच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यात मला काही वेगळं वाटत नाही.

मी शंभर टक्के अनिल सोलेंच्या बरोबर आहे, त्यांचं पूर्ण समर्थन करतो, मी पक्षाच्या कुठल्याही चाकोरीच्या बाहेर जात नाही, पक्षाच्या चाकोरीत राहूनच कार्य करतो. आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर मिळून हे कार्य आम्ही शंभर टक्के यशस्वी करू. भाजप अगदी एकसंघ आहे त्यात अंतर्गत लोकशाही आहे, त्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे.  ते त्यांना मान्य आहे त्यामुळे त्याची आम्हाला इनडायरेक्टली अनुमती आहे असे मी समजतो, असं यावेळी गिरीश व्यास यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...