AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का; आता थेट घरातूनच आव्हान, मोठी बातमी समोर

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ओमराजे निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर काही नगरसेवक देखील फुटले, यावरून आता धाराशिवमध्ये वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का; आता थेट घरातूनच आव्हान, मोठी बातमी समोर
omraje nimbalkar
| Updated on: Aug 28, 2026 | 5:42 PM
Share

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे तीनच खासदार शिल्लक आहेत, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांचा आकडा मात्र वाढला असून, महायुतीमध्ये राज्यात सर्वाधिक खासदार हे शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. दरम्यान ज्या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश होता, दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे काही नगरसेवक देखील फुटले, यावरून आता जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात त्यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर हे गद्दार आहेत, आमचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य फोडायला नको होते, येत्या काळात त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. आमच्या शिवसैनिकांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, तुमच्यात दम असेल तर मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा राजीनामा देऊन, पुन्हा निवडणूक लढवून दाखवा, असं थेट आव्हानच ओमराजे निंबाळकर यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनी ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांना केलं आहे.

ठाकरे गट आक्रमक 

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला शिवसेना शिंदे गटाने मोठा धक्का दिला होता, तब्बल 6 खासदार फोडले, हा धक्का ताजा असतानाच आता धाराशिवमधील चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे कळंबमधील नऊ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमच्यात दम असेल तर मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा राजीनामा देऊन, पुन्हा निवडणूक लढवून दाखवा, असं थेट आव्हानच ओमराजे निंबाळकर यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनी केलं आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे