AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपावर जाणाऱ्या निवासी डॉक्टरांना मोठा दणका, हाय कोर्टातून मोठी बातमी

हा संप ताबडतोब मागे घ्यायला हवा. डॉक्टरांच्या संपामुळे एकही रुग्णाचा जीव जायला नको. अशा शब्दात हाय कोर्टाने निवासी डॉक्टरांना सुनावलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 सप्टेंबर रोजी होणार आहे.

संपावर जाणाऱ्या निवासी डॉक्टरांना मोठा दणका, हाय कोर्टातून मोठी बातमी
कोर्टाचा डॉक्टरांना दणका Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 06, 2026 | 3:04 PM
Share

होमियोपथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत सशर्त नोंदणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात राज्यातील 7 हजार निवासी डॉक्टर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या निर्णयाविरोधात बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा मोठा फटका हा वैद्यकीय सेवेला बसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान निवासी डॉक्टरांच्या आंदोलनावरून हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे.  प्रभारी मुख्य न्यायाधीश रविंद्र घुगे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी संपात सहभागी असलेल्या डॉक्टरांची हायकोर्टाकडून चांगलीच कानउघडणी करण्यात आली आहे.

हायकोर्टाने नेमंक काय म्हटलं? 

हा संप ताबडतोब मागे घ्यायला हवा. डॉक्टरांच्या संपामुळे एकही रुग्णाचा जीव जायला नको. तुम्ही ही आंदोलन करून रुग्णांना वेठीस धरून जरी यश मिळवलं तरी मधल्या काळात जर ५० रुग्णांचा जीव गेला तर तुम्ही तो परत आणू शकणार आहात का ? असा सवाल यावेळी हायकोर्टाने उपस्थित केला आहे. हायकोर्टाने निवासी डॉक्टरांच्या संपाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना चांगलंच फटकारलं आहे.

जर तुम्ही कामच करत नसाल तर आम्ही तुमचे पगार थांबवण्याचे निर्देश देऊ, असा इशाराही यावेळी हायकोर्टाच्या वतीने निवासी डॉक्टरांना देण्यात आला आहे. दरम्यान यावेळी हायकोर्टात युक्तिवाद करताना आंदोलक डॉक्टरांच्या वकिलांकडून  होमिओपॅथीच्या डॉक्टरांसाठी असलेल्या ब्रिज कोर्सवर आक्षेप घेण्यात आला आहे. नीटची परीक्षा देऊन विद्यार्थी डॉक्टर होतात, मग एका ब्रिज कोर्समुळे होमिओपॅथीच्या डॉक्टरांना एलोपॅथीचे हक्क देणं योग्य आहे का? असा युक्तिवाद यावेळी आंदोलक डॉक्टरांच्या वकिलाने न्यायालयात केला आहे.

दरम्यान डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे निर्देश यावेली हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. आम्ही तुमची बाजू ऐकून घेऊ, पण संप तातडीने मागे घेणे आवश्यक आहे. संप मागे घेतला जात असेल तर आम्ही तुमची बाजू लवकरात लवकर ऐकून घेऊ. डॉक्टरांनी संप करणं योग्य आहे का? तुम्ही उपचार करण्यास नकार देताय, रुग्णांना सेवा देत नाहीत हे छान वाटतं का? असा सवालही यावेळी न्यायालयाने उपस्थित केला आहे.  दरम्यान याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल