मोठी बातमी! राष्ट्रवादीचा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, रायगडमध्ये वार फिरलं, मोठा पक्षप्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मोठा पक्षप्रवेश झाला आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, रायगडमध्ये वार फिरलं, मोठा पक्षप्रवेश
शिवसेनेला धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 10:13 PM

महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजपने एकमेकांचे संभाव्य उमेदवार फोडले होते. एकमेकांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याचं देखील पहायला मिळालं.  यावरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर महायुतीमधील घटक पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते आणि नेते आपल्या पक्षात घ्यायचे नाहीत असं ठरलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचं पहायला मिळत आहे.

पालघरमध्ये भाजपने शिवसेना  शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पालघर दौऱ्यावर असताना श्रीनिवास वनगा यांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला. हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान यावरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री  उदय सामंत यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती. शिवसेना शिंदे गटासाठी हा धक्का ताजा असतानाच आता रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

Loading...

रायगडमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे  रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय ताकद दाखवून दिली आहे. माणगाव येथील क्षत्रिय मराठा भवनमध्ये पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी   राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान शिवसेनेला हा सलग दुसरा धक्का बसला आहे. आधी भाजपने तर आता राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला आहे.

दरम्यान रायगडच्या माणगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार आणि युगेंद्र पवार यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. या बैठकीबाबत आपल्याला माहिती नाही, परंतु विद्या प्रतिष्ठानमध्ये राजकारण आणू नये, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us