AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election 2025 Date: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली अखेरची तारीख

Supreme Count on Maharashtra Local Body, BMC Election 2025 Date News Update: राज्यात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या असा स्पष्ट आदेश दिला आहे.

Maharashtra Election 2025 Date: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली अखेरची तारीख
| Updated on: Sep 16, 2025 | 3:14 PM
Share

राज्यात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या असा स्पष्ट आदेश दिला आहे.

31 जानेवारी 2026 पर्यंत या निवडणुका घ्या, कोर्टाचा आदेश

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यासाठी अखेरची तारीख सांगितली आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत या निवडणुका घ्या असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत पार पडणार आहेत.

याआधी दिली होती 4 महिन्यांची मुदत

याआधी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात या निवडणुका घेण्याचा आदेश दिला होता. मात्र पावसामुळे आणि इतर कारणामुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित निकालामुळे 2022 पासून या निवडणुका रखडलेल्या आहेत. मात्र आता कोर्टाने निवडणूक घेण्याचे अंतिम आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पुढील 4 महिन्यांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत.

कोर्टाची महत्त्वाची सूचना

कोर्टाने आज निवडणुकीसाठी स्पष्ट वेळापत्रक घालून दिलं आहे. याआधी दिलेली चार महिन्यांची दिलेली मुदत संपल्यावर अर्ज दाखल केल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाने EVM कमी, बोर्ड परीक्षा आणि स्टाफ कमी आहे अस कारण आज कोर्टाला सांगितलं, मात्र कोर्टाने बोर्ड परीक्षेचं कारण फेटाळून लावलं तर बाकी दोन कारणासाठी सूचना दिल्या आहेत. प्रभाग रचना 31 ऑक्टबर 2025 पर्यंत पूर्ण झाल्याचं पाहिजे अस कोर्टाने सांगितलं आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात EVM पूर्तता झाली पाहिजे असंही कोर्टाने म्हटलं आहे.

34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलं होतं. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, घाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुरुष मागस प्रवर्गासाठी आरक्षण तर रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड या ठिकाणी महिला मागस प्रवर्गासाठी आरक्षण असणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.