
राज्य सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. विशेष म्हणजे या योजनेचा थेट फायदा महायुतीला झाला आणि राज्यातील बहिणींनी मोठे प्रेम सरकारला दिले. भरघोष मते लाडक्या बहिणींनी सरकारला दिली थेट दुसऱ्यांदा महायुतीने राज्यात सरकार स्थापन केले. दर महिन्याला लाडक्या बहिणींना सरकारकडून 1500 रूपये दिली जातात. हे पैसे थेट महिलांच्या बॅंक खात्यात येतात. निवडणुकीच्या वेळी सरकारने लाडक्या बहिणींना 1500 नंतर ते 2100 रूपये हप्ता देणार असल्याने मान्य केले होते. मात्र, अजूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 करण्यात आला नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींनी हप्ता मिळण्यास उशीर झाला होता. काही दिवसांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या बॅंकेत जमा झाला. मात्र, काही महिलांना हा हप्ता मिळाला नसल्याने संताप बघायला मिळत आहे.
केवायसी अपडेटमुळे अनेक महिलांना या महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाहीये. यादरम्यान सरकारने अंगणवाडी सेविकांकडे संपर्क साधण्याचा आवाहन लाडक्या बहिणींना केले आहे. केवायसी करूनही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये. आता केवायसीमुळे लाभ न मिळालेल्या महिलांची प्रत्यक्षात पडताळणी केली जाणार आहे.
नुकताच आलेल्या आकड्यांवरून केवायसीमुळे तब्बल 30,918 महिलांचा लाभ बंद झाला आहे. 31 जानेवारीपर्यंत केवायसीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30,918 पैकी 22921 महिला या ग्रामीण भागातील आहेत. आधारकार्डाची झेरॉक्स आणि स्वयंमघोषणीत प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतर महिलांना लाडक्या बहिणीची हप्ता मिळेल.
या महिन्यात काही महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नसल्याने महिला संतप्त झाल्या. ई केवायसी केल्याशिवाय लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचे अगोदरच सांगण्यात आले होते. मात्र, काही महिलांचे म्हणणे आहे की, आम्ही केवायसी करूनही आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही. आता त्यांना आधारकार्डची झेरॉक्स आणि स्वयंमघोषणीत प्रमाणपत्राची तपासणी करून घ्यावी लागणार आहे.