मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईत जाणार की नाही? सर्वात मोठी अपडेट, हाय कोर्टातून मोठी बातमी
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतर त्याविरोधात मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर हाय कोर्टात सुनावणी सुरू आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई हाय कोर्टाकडून महत्त्वाची टिप्पणी करण्यात आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 14 वा दिवस आहे. दरम्यान त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतर त्याविरोधात मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर हाय कोर्टात सुनावणी सुरू आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई हाय कोर्टाकडून महत्त्वाची टिप्पणी करण्यात आली आहे. भीतीच्या आधारावर प्रतिबंधात्मक आदेश देता येत नाहीत, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे, त्याविरोधात मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आता सुनावणी सुरू आहे. मुंबईतील मोर्चामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान या सुनावणीवेळी मुंबई हाय कोर्टाकडून महत्त्वाची टिप्पणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील हे अजून मुंबईत आलेले नाहीत, त्यामुळे केवळ भीतीच्या आधारावर प्रतिबंधात्मक आदेश देता येत नाहीत, असं न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान गेल्यावेळी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांनी मुंबईत धडक दिली होती, त्यानंतर हाय कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
