AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याच्या राजीनाम्यानं खळबळ

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत, आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं राजीनामा दिला आहे.

मोठी बातमी! राज्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याच्या राजीनाम्यानं खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 11, 2025 | 2:45 PM
Share

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती सुरूच आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. मात्र आता त्यापूर्वीच राज्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी देखील महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, आणि त्यानंतर काँग्रेसचा नंबर लागतो, काँग्रेसमधल्या देखील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.

दरम्यान आज आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जळगावातील काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आदिवासी नेत्या म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.  दोन वर्षांपूर्वीच प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता व त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर 

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान आता शिंदे या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रतिभा शिंदे यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचं या निवडणुकांबाबत अद्याप कुठलंही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. त्यातच महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. घटक पक्षांना लागलेली गळती थांबवण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था