Politics | पहाटेचं सरकार पडलं तेव्हापासून BJPचा थयथयाट, Nana Patole यांचा टोला
राज्यात भाजपाकडून (BJP) आरोपांचे मनोरंजन सत्र सुरू आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे 19 बंगले आहेत, असा आरोप भाजपाच्या वतीने झाला. मात्र आरोप करणारा तिथे पोहोचला तेव्हा बंगले गायब झाले, असे आरोप बिनबुडाचे असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले
राज्यात भाजपाकडून (BJP) आरोपांचे मनोरंजन सत्र सुरू आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे 19 बंगले आहेत, असा आरोप भाजपाच्या वतीने झाला. मात्र आरोप करणारा तिथे पोहोचला तेव्हा बंगले गायब झाले, असे ते म्हणतात. असे जे आरोप करून सरकारला आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कटकारस्थान करत आहेत ते आता थांबवले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत. भाजपाला जनतेने सत्तेत बसवले. त्याचा दुरुपयोग होत आहे. संजय राऊत यांनी सुद्धा केलेल्या आरोपांसंदर्भात राज्यातील तपास यंत्रणांकडून चौकशी व्हायला पाहिजे. दोषी असेल त्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. भाजपाने सुरू केले हे सगळे. आता ते कुठेतरी थांबले पाहिजे. पहाटेचे सरकार पडले तेव्हापासून यांची थयथयाट सुरू आहे. हे थांबले पाहिजे, कारण भाजपाचे कुठलेही आरोप सिद्ध झाले नाहीत, असेही नाना म्हणाले.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

