AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये, उत्तर मुंबईतून एवढे नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. यावर बोलताना मुंबई महापालिका निवडणुकीबाबत पियुष गोयल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई महापालिकेसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये, उत्तर मुंबईतून एवढे नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2025 | 2:40 PM
Share

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होऊ शकतात. यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीचा देखील समावेश आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येणार? महापौर कोणत्या पक्षाचा असणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते पियुष गोयल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, उत्तर मुंबईमधून किमान 38 नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं लक्ष्य आहे, असं, गोयल यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले पियुष गोयल? 

उत्तर मुंबई सज्ज आहे, आगामी बीएमसी निवडणुकीबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. उत्तर मुंबईतून किमान 38 नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं लक्ष्य आहे, महायुतीला उत्तर मुंबईतून ऐतिहासिक जागा मिळतील, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यानंतर मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधू  मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे, यावर देखील गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील लोक जागरूक आहेत. मुंबईतील नागरिकांना, मुंबईतील मतदारांना त्यांचे भविष्य कुठे सुरक्षित आहे हे चांगलेच माहिती आहे. येथे मतदान केल्याने मुंबईचा विकास वेगाने होईल. केंद्रात एनडीएचे सरकार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. मुंबईतील लोकांना नक्कीच वाटेल की आपण दुहेरी इंजिनला तिहेरी इंजिनमध्ये रुपांतरीत करावे, आणि चांगल्या लोकांना नगरसेवक म्हणून निवडून आणावे. महायुतीचा महापौर महानगरपालिकेत निश्चितच बसेल, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

 निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया 

दरम्यान दुसरीकडे मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  लोकांच्या मनावर कृतीचा फरक पडतो, हे काम देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे आणि अजित पवार करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी जे जे काही करता येईल ते करत आहे. सभागृहात सगळ्या आमदारांना नियमावली ठरवून दिली आहे,  जे काही शब्दांचा वापर करतात ते पटलावरुन आम्ही काढून टाकतो, बाहेर काय होतं त्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा