भाऊंना कोरोना झाला होता, त्यांना वेळेत इंजेक्शन मिळालं नाही, हरिभाऊंच्या आठवणीने खडसे गदगदले

हरिभाऊंना कोरोना झाला होता. त्यांना इंजेक्शन वेळेवर मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता," असे खडसे (Haribhau Jawale death Eknath Khadse Cried) म्हणाले.

भाऊंना कोरोना झाला होता, त्यांना वेळेत इंजेक्शन मिळालं नाही, हरिभाऊंच्या आठवणीने खडसे गदगदले
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 8:02 PM

जळगाव : भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे आज (16 जून) निधन झालं. बॉम्बे  रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “हरिभाऊ जावळेंना कोरोना झाला होता. त्यांना इंजेक्शन वेळेवर मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता,” असे भाजप नेते एकनाथ खडसे म्हणाले. तसेच हरिभाऊंविषयी बोलताना खडसेंना अश्रू अनावर झाले. (BJP Jalgaon president Haribhau Jawale death Eknath Khadse Cried)

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“हरिभाऊ जावळेंचं भाजप विस्तारात फार मोठं योगदान राहिलं आहे. आमदार, खासदार म्हणून पूर्ण महाराष्ट्राभर तसेच जळगावात एक आगळावेगळा ठसा उमटवला होता. हसरं व्यक्तिमत्त्व, मनाने निर्मळ असे ते नेते होते. ते सर्वांना सोबत घेऊन सहकार्याच्या भावनेने काम करत होते,” असे एकनाथ खडसे म्हणाले.

“हरिभाऊंना कोरोनाचा आजार झाला. या आजारात त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर दहा-बारा दिवस ज्या इंजेक्शनची आवश्यकता होती, ते उपलब्ध होऊ शकलं नाही. परवा दिवशी दोन, आज तीन, आज दोन, असे सात इंजेक्शन आज उपलब्ध झाले. आज त्यांचा कोर्स सुरु होणार होता. कदाचित तो कोर्स सुरु झाला असता, तर त्यांचा जीव वाचला असता. पण खूप प्रयत्नानंतरही ते उपलब्ध होऊ शकत नाही. मी स्वत: मुंबईतील रुग्णालयात होतो. त्यांच्या मुलाने आणि मी ते इंजेक्शन मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते मिळाले नाही,” असेही एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितले.

त्यांच्या निधनामुळे भाजपची आणि समाजाची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. ती भरुन निघणं फार कठीण आहे. त्यांची आठवण आम्हाला कायमस्वरुपी राहील. एक हसरं व्यक्तिमत्व, मनाने निर्मळ असा हा नेता सर्वांना सोबत घेऊन काम करणारा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली.

कोण होते हरिभाऊ जावळे?

  • हरिभाऊ जावळे हे विद्यमान जळगाव भाजप अध्यक्ष होते
  • मोठ्या वादानंतर हरिभाऊ जावळे यांची या वर्षीच्या सुरुवातीला भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती
  • हरिभाऊ जावळे यांनी लोकसभा आणि विधानसभेचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
  • हरिभाऊ जावळे यांनी १९९९ ते २००४ पर्यंत विधानसभेवर निवडून गेले.
  • हरिभाऊ जावळे यांनी रावेर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
  • २००७ मध्ये पोटनिवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले होते
  • मग २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांच्या ऐवजी रक्षा खडसे यांना तिकीट मिळालं
  • त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये रावेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले
  • मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शिरीष चौधरींनी त्यांचा पराभव केला

(BJP Jalgaon president Haribhau Jawale death Eknath Khadse Cried)

संबंधित बातम्या : 

भाजपचे माजी खासदार आणि विद्यमान जळगाव अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचं निधन

शाईफेकीनंतर पोशाख बदलून रावसाहेब दानवे पुन्हा बैठकीत, धक्काबुक्कीनंतर अखेर जळगाव भाजप जिल्हाध्यक्ष ठरला

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.