Sanjay Rathod | सरकार बदललं, संजय राठोडांवरील आरोपांचं काय? चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

तत्कालीन वनमंत्री संजय राठोडांवर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची भूमिका काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांना स्पष्ट उत्तर दिलं.

Sanjay Rathod | सरकार बदललं, संजय राठोडांवरील आरोपांचं काय? चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
Image Credit source: tv9 marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jul 07, 2022 | 3:55 PM

मुंबईः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं आणि भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेची सत्ता आहे. तत्कालीन सरकारचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधात भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी गंभीर आरोप केले होते. पुण्यात एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड दोषी असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आता सरकार बदललं. शिंदे गट आणि भाजप सत्तेत आहे. विशेष म्हणजे संजय राठोड हेदेखील शिंदे गटातील शिवसेनेचा भाग बनलेत. त्यामुळे आता संजय राठोडांविरोधात भाजपने घेतलेला आक्रमक पवित्रा आता वरमणार का, असा प्रश्न विचारला जातोय. तत्कालीन वनमंत्री संजय राठोडांवर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची भूमिका काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांना स्पष्ट उत्तर दिलं.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

पुणे जिल्ह्यातील थेउर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्य मोकळ्या जागेत एका तरुणीचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना संजय राठोडांना पुणे पोलिसांनी क्लीन चीट दिली, यावर प्रतिक्रिया विचारली. तेव्हा त्या म्हणाल्या, आता हाच प्रश्न पुणे पोलीस आयुक्तांना जाऊन विचारा. माझी लढाई अजून सुरूच राहणार आहे. हे प्रकरण कोर्टात दाखल आहे. पुणे पोलिसांनी कोणत्या आधारे संजय राठोडला क्लीन चिट दिली, याबाबत मला माहिती नसून त्याबद्दल पोलिसांना कोर्टात स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. भाजपसोबत युतीत आल्यावर मी केस मागे घेतलेली नाही. माझा लढा चालूच राहणार आहे.. असं चित्रा वाघ म्हणाल्या.

काय आहे नेमकं प्रकरण?

बीड जिल्ह्यातील परळी येथील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने पुणे येथे कथितरित्या आत्महत्या केल्याचे फेब्रुवारी 2021 मध्ये उघडकीस आले होते. राज्याचे तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोषी असल्याचा ठपका भाजपाकडून ठेवण्यात आला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांविरोधात वेळोवेळी आक्रमक भूमिका मांडली आहे. सदर प्रकरणी न्यायप्रविष्ट असून पुण्यातील वनवडी पोलिसांनी मात्र पूजा चव्हाण हिचा मृत्यू घातपात नसून अपघाती असल्याचा खुलासा केला. त्यामुळे संजय राठोडांना क्लिन चीट मिळाल्याचं बोललं जात होतं. आता एकनाथ शिंदे गटात संजय राठोड शामिल झाल्यामुळे सत्तेतील मित्रपक्ष या नात्याने चित्रा वाघ यांची भूमिका मवाळ होणार का, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र वाघ यांनी आपली स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर मांडली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें