Chitra Wagh : …अन्यथा मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार; बीएमसी शाळा आणि घोटाळ्यांवरून चित्रा वाघ यांचा इशारा

आजवर निविदा काढण्यात वेळ घालवला. आता सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी मुलांच्या खात्यात त्वरीत पैसे जमा करावेत आणि जिथे ज्या मुलांची बँक खाती नाहीत तिथे मुख्याध्यापकांमार्फत रोख रक्कम देऊन त्या मुलांनी या वस्तू खरेदी केल्या याची खात्री करावी, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Chitra Wagh : ...अन्यथा मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार; बीएमसी शाळा आणि घोटाळ्यांवरून चित्रा वाघ यांचा इशारा
भाजपा नेत्या चित्रा वाघ
Image Credit source: Twitter
प्रदीप गरड

|

Jul 07, 2022 | 2:15 PM

मुंबई : गेल्या पाच वर्षातील सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारी धोरणाने मनपा शाळांचे (BMC Schools) आतोनात नुकसान झाले आहे. याप्रकरणी जे लोक सहभागी असतील त्या सर्वांची विभागीय चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे. येत्या चार-पाच दिवसांच योग्य कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त तसेच प्रशासर इकबालसिंग चहल यांना पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे. मुंबई महापालिकेच्या शाळा आणि त्या अनुषंगाने झालेले घोटाळे, टक्केवारी यावरून त्यांनी मागील सरकारवर तसेच मुंबई महापालिकेत शिवसेनेची (Shivsena) सत्ता आहे. त्यावरून त्यांनी घोटाळ्यांचे आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.

’25 दिवस होऊनही गणवेष, शालेय साहित्य नाही’

वाघ यांनी म्हटले आहे, की मुंबई महापालिका शाळा टॅब घोटाळे ते इमारतींची दुरवस्था अशा अनेक कारणांनी मनपा शाळांविषयी नकारात्मक भावना तयार झाली आहे. ज्या ज्या अधिकाऱ्यांकडून विलंब झाला यासर्वांची विभागीय चौकशी करण्यात यावी आणि दोर्षींवर कारवाई करण्यात यावी. मनपा शाळेतील पाल्यांना शालेय साहित्य वाटप करणे मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे. परंतु शाळा सुरू होऊन 25 दिवस झाले तरी महापालिकेच्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या अंगात ना नवीन गणवेश होता , ना नवीन वह्या ना नवीन दफ्तरे होती. आपल्या शाळेचा पहिला दिवस नवीन गणवेश घालून सुरू व्हावा तसेच नवीन दफ्तर, नवीन वह्यांचा सुगंध घ्यावा, ही प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलांची नाजूक भावना असते, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

wagh

हे सुद्धा वाचा

‘मुलांच्या खात्यात त्वरीत पैसे जमा करावेत’

आजवर निविदा काढण्यात वेळ घालवला. आता सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी मुलांच्या खात्यात त्वरीत पैसे जमा करावेत आणि जिथे ज्या मुलांची बँक खाती नाहीत तिथे मुख्याध्यापकांमार्फत रोख रक्कम देऊन त्या मुलांनी या वस्तू खरेदी केल्या याची खात्री करावी. निविदा काढून पाच महिने झाले तरी मग टक्केवारीच्या सेंटिगसाठी हा वेळ वाया घालवला का, अशी शंका उपस्थित होत आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, येत्या चार दिवसांमध्ये ही कार्यवाही करावी, अन्यथा आयुक्तांच्या दालनाबाहेर आम्ही स्वत: ठिय्या मारत आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें