चित्रा वाघ यांच्यामुळे चर्चेत आलेले पती किशोर वाघ कोण आहेत?; वाचा सविस्तर!

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (who is kishor wagh? read special report)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:00 PM, 27 Feb 2021
चित्रा वाघ यांच्यामुळे चर्चेत आलेले पती किशोर वाघ कोण आहेत?; वाचा सविस्तर!
किशोर वाघ

मुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुन्हा एकदा किशोर वाघ चर्चेत आले आहेत. कोण आहेत किशोर वाघ? त्यांच्याविरोधातील काय आहे प्रकरण? याचा घेतलेला हा सविस्तर आढावा… (who is kishor wagh? read special report)

काय आहे प्रकरण?

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. 1997 मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा स्पाइनल कॉर्डच्या शस्त्रक्रिये दरम्यान गांधी रुग्णालयात मृत्यू झाला होता. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला होता. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर तक्रारदाराने राष्ट्रीय ग्राहक निवारण कक्षाकडेही तक्रार केली होती. त्यानंतर वैद्यकीय नोंदी ठेवणारे किशोर वाघ यांनी 15 लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारदाराच्या भावाच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून अर्ज करण्याची सूचना तक्रारादारास केली होती. त्यासाठी वाघ आणि त्यांचे दोन साथीदार गजानन भगत आणि संदेश कांबळे यांनी चार लाखांची लाचही मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

एक कोटीची बेहिशोबी मालमत्ता आढळली

त्यानंतर एसीबीने सापळा रचून 5 जुलै 2016 रोजी किशोर वाघ यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. याप्रकरणी वाघ यांना निलंबितही करण्यात आले होते. त्यानंतर एसीबीकडून 1 डिसेंबर 2006 ते जुलै 2016 दरम्यान वाघ यांच्याकडे असलेल्या उत्पन्नाचा तपास करण्यात आला होता. यामध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची आवक जावक, वारसाहक्काची मालमत्ता, खर्च इत्यादी बाबींचा सविस्तर तपास करण्यात आला. या तपासात त्यांच्याकडे 1 कोटी 3 लाख 46 हजार 663 रुपये अधिकची संपत्ती आढळून आली आहे. त्यांच्या उत्पन्ना पेक्षा 90 टक्के अधिक ही रक्कम होती. त्यानंतर एसीबीने 12 फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एसीबीने वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13 (2) आणि 13 (1) ई या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

किशोर वाघ यांची वैयक्तिक माहिती माहिती

किशोर वाघ यांचं संपूर्ण नाव किशोर जगन्नाथ वाघ असं आहे. किशोर आणि चित्रा वाघ यांचा विवाह 27 वर्षांपूर्वी झाला होता. दरवर्षी 11 मे रोजी ते लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. किशोर वाघ 52 वर्षांचे आहेत. किशोर आणि चित्रा वाघ यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव आदित्य आहे. आदित्य हा विद्यार्थी असून मिळालेल्या माहितीनुसार आदित्य मुंबईबाहेर शिकत आहे. (who is kishor wagh? read special report)

 

संबंधित बातम्या:

चित्रा वाघ यांच्या पतीचं काय आहे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण?; वाचा सविस्तर रिपोर्ट

मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास : चित्रा वाघ

संजय राठोड यांचे घटनेच्या दिवशी पूजाला 45 फोन, अरुण राठोडची 101वरून कबुली; चित्रा वाघ यांचा दावा

(who is kishor wagh? read special report)