Pune Minor Girl Murder | ‘सावित्रीच्या लेकींसाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करणार ?’ पुण्यात अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर चित्रा वाघ आक्रमक

पुणे येथील अल्पवयीन मुलीची कोयत्याने वार करुन हत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हत्येनंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

Pune Minor Girl Murder | 'सावित्रीच्या लेकींसाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करणार ?' पुण्यात अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर चित्रा वाघ आक्रमक
CHITRA WAGH ON PUNE GIRL MURDER


मुंबई : पुण्यात अल्पवयीन मुलीची कोयत्याने वार करुन हत्या केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हत्येनंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे म्हणत त्यांनी सरकार सावित्रीच्या लेकींसाठी महाराष्ट्र बंद कधी करतंय अशी खोचक प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या ?

चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाआहे. त्यांनी “अतिशय भयानक… पुण्यात काय चाललंय ? कोयत्याने वार करून खून करण्यात आला. टाईप करतानाही अंगावर काटा येत आहे. त्या मुलीने काय भोगलं असेल..? राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पोलिसांचे कायदे फक्त कागदावर आहेत. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत. यांच्यासाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करतंय ?” असे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

पुण्यात अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार

पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केलाय. विशेष म्हणजे आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे धाडस केलं आहे. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती.

मुलगी मैदानात कबड्डी खेळत होती

मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आोरपीसोबत अन्य दोन व्यक्ती होते. हत्येआधी मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. यातच अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.

शीर धडापासून वेगळं करण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा अत्यंत रागामध्ये अल्पवयीन मुलीकडे आला होता. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. मात्र आरोपीने मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार केल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला. तसेच या मुलीचे डोके धडापासून वेगळे करण्याचा मानस या ओरपींचा होता की काय ? अशी शंका अपस्थित केली जात आहे

इतर बातम्या :

आघाडी सरकारला येणाऱ्या काळात सळो की पळो करुन सोडू, आशिष शेलारांचा इशारा

शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नेत्यांची खलबतं, बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा?

कॅलिफोर्नियात विमानाचा मोठा अपघात, मूळच्या पुण्यातील डॉक्टरसह आणखी एकाचा मृत्यू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI