AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP-Shivsena : भाजप नेत्या श्वेता महालेंचे शब्द शिंदेंच्या आमदाराच्या मनाला भिडले, लगेच पलटवार, जिल्ह्यातील अनेक पळून गेलेल्या मुली मी..

BJP-Shivsena : सध्या महायुतीच्या दोन आमदारांमध्ये जोरदार जुंपली आहे. बिहार झालाय हे शब्द मनाला भिडले. लगेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदाराने आपल्या खास स्टाइलमध्ये प्रत्युत्तर दिलं.

BJP-Shivsena : भाजप नेत्या श्वेता महालेंचे शब्द शिंदेंच्या आमदाराच्या मनाला भिडले, लगेच पलटवार, जिल्ह्यातील अनेक पळून गेलेल्या मुली मी..
Shweta Mahale
| Updated on: Sep 29, 2026 | 1:48 PM
Share

गणेश सोलंकी, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात जोरदार सामना रंगला आहे. दोन्ही बाजूंकडून शाब्दीक द्वंद सुरु आहे. परस्परांच्या मतदारसंघात जाऊन जंगी वाढदिवस साजरा करण्यावरुन या सर्व वादाची सुरुवात झाली. “बुलढाण्याचा बिहार झाला आहे. आपल्याला पुन्हा बिहारचा शांत बुलढाणा करायचा आहे. यापुढे बुलढाणा मतदारसंघात कुठेही हुकूमशाही दडपशाही अजिबात चालणार नाही” असं श्वेता महाले म्हणाल्या. विजुभाऊंच्या (सत्कार कार्यक्रमाचे आयोजक ) पत्नीलाही उचलून नेण्याची व गायब करण्याची भाषा झाली, असा गंभीर आरोपही श्वेता महाले यांनी केला. त्यावर आता आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे.

बुलढाण्याचा बिहार झाला म्हणतात, पण कमीत कमी आरोप करताना इतिहास पाहिला पाहिजे. ज्या माणसाने मुलींचे संसार बसवण्यासाठी स्वतःचे रक्त सांडले. साडेसात हजार मुलींचे संसार बसविले असा दावा संजय गायकवाड यांनी केला. “जिल्ह्यातील अनेक पळून गेलेल्या मुली संजय गायकवाड यांनी परत आणल्या. एवढा विश्वास मुलींच्या आई वडिलांना आहे. असे असताना उपट सुंबे आरोप करायचे आणि बदनाम करायचे” असं प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं.

हे वक्तव्य संजय गायकवाड यांच्या जिव्हारी लागलं

“रात्री बारा वाजता एकटी मुलगी बुलढाण्यामध्ये फिरू शकते आणि याला जर ते बिहार समजत असतील तर मला त्यांच्या बुद्धीची कीव येते” असं संजय गायकवाड म्हणाले. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचा बुलढाणा मतदार संघातील गावात सत्कार झाला. हा सत्कार स्वीकारताना श्वेता महाले यांनी आमदार संजय गायकवाड यांना डिवचलं. बुलढाण्याचा बिहार झाला असं त्या म्हणाल्या. त्यांचं हे वक्तव्य संजय गायकवाड यांच्या भरपूर जिव्हारी लागलं.

..तर बाई बापासारखे शरीर कुठून आणणार

काही दिवसांपूर्वी श्वेता महाले त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुलढाण्यात आल्या होत्या. यावेळी जोरदार सेलिब्रेशन झालेलं. आमदार महाले ‘बाप तो बाप रहेगा, या गाण्यावर थिरकलेल्या. त्यांनी बाण सोडतानाची Action करुन आमदार संजय गायकवाड यांना डिवचलेलं. त्यावर माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणालेले की, “बाप तो बाप रहेगा हे माणसाने बोललेले बरं. पण एखाद्या बाईने म्हटले की, बाप आहे… तर बाई बापासारखे शरीर कुठून आणणार” असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं.

Follow Us
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?