Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात ट्विस्ट, ठाकरे कुटुंबाला डाग कोणी डाग लावला? भाजप नेता खूप काही बोलून गेला

दिशा सालियन प्रकरणात ट्विस्ट निर्माण होत आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव समोर आलं आहे. यावर भाजप नेते नवनाथ बन यांनी भाष्य करत गंभीर आरोप केला आहे.

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात ट्विस्ट, ठाकरे कुटुंबाला डाग कोणी डाग लावला? भाजप नेता खूप काही बोलून गेला
Disha salian case
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 15, 2026 | 12:14 PM

दिशा सालियन प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहे. आता या प्रकरणाची पुन्हा चौकशी होत आहे. आता या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिशा सालियान प्रकरणाच्या आडून ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबाला डाग लावण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. आता दिशा सालियन प्रकरणावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे कुटुंबाला कोणीही डाग लावण्याचे प्रयत्न करत नाही, अशी प्रतिक्रिया देत भाजप नेते नवनाथ बन यांनी आरोपांचंं खंडन केलं.

भाजप नेते नवनाथ बन यांनी दिशा सालियन प्रकरणावर भाष्य केलं. भाजप नगरसेवक नवनाथ बन म्हणाले, ‘आता या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय, तो सरकारच्या सांगण्यावरून झाला नाही. कोर्टाकडून तो झाला आहे. महायुतीचे सरकार होते, तेव्हा क्लोजर रिपोर्ट दिला.
राजकीय षड्यंत्रातून केला असता तर क्लोजर रिपोर्ट दिला, डर नसेल तर घाबरायचे कारण काय? दूध का दूध पानी का पानी होईल.
कोणीही ठाकरे कुटुंबाला डाग लावण्याचे काम करत नाही आहे. उलट तुम्हीच उलटसुलट गोष्टी करत डाग लावला आहे. दिशा सॅलियन प्रकरणात चौकशीतून गोष्टी समोर येतील’.

‘चौकशीला सामोरे आणि काय ते खरं निष्पन्न होईल. संजय राऊतांनी डिलिमिटेशनला पाठिंबा दिला, तरी किती खासदार त्यांच्याकडे आहे?
तुमच्याकडे ३ खासदार आहेत, ते रिक्षामध्ये बसायला कामी येतील. इन मिन तीन अशी तुमची अवस्था आहे, त्यावर काय डिलिमिटेशन होणार नाही. तुम्ही दिला काय आणि नाही दिला काय? काही फरक पडत नाही. राजकीय पटलावरुन आदित्य ठाकरेंना दूर करायचे हे प्रयत्न त्यांचे आहेत. उबाठा आपल्या ताब्यात घ्यायचा आणि आदित्य ठाकरेंना दूर करायचे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सामना आपण बघितला आहे. सर्वाधिक आनंद आदित्य ठाकरे अडकले तर संजय राऊत यांना होणार आहे, असा आरोप  नवनाथ बन यांनी केला.

महाराष्ट्र बहुभाषिक असल्याचे शहांच्या वक्तव्याचं समर्थ करत नवनाथ बन म्हणाले, ‘मराठी माणसांचाच महाराष्ट्र आहे.
महाराष्ट्रात बहुभाषिक राहतात. जसे दिल्लीत, गुजरातमध्ये राहतात. मुंबई आणि महाराष्ट्रावर पहिला हक्क मराठी माणसांचाच आहे.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नईत विविध भाषा बोलणारे राहतात. अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला आहे.
संयुक्त महाराष्ट्र होऊ नये यासाठी कांग्रेसने प्रयत्न केलेत. मराठी माणसाच्या धोतराच्या काष्टाला हात घातला नाही, तर मराठी माणसाने तुमचा लंगोट सोडला आहे. तुमचं वस्त्रहरण झालं आहे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना विचारा. वस्त्रहरण १३ कोटी जनतेनं केले आहे’ .

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us